८० वर्षांच्या आजींनी चार दिवसात कोरोनाला हरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:30 IST2021-04-26T04:30:46+5:302021-04-26T04:30:46+5:30

केज तालुक्यातील आडस येथील राजकुमारी पितांबरसिंह पवार ( ८० ) या आजी भावकीतील लग्न सोहळ्याला परिवारासह उपस्थित होत्या. यानंतर ...

The 80-year-old grandmother lost to Corona in four days | ८० वर्षांच्या आजींनी चार दिवसात कोरोनाला हरविले

८० वर्षांच्या आजींनी चार दिवसात कोरोनाला हरविले

केज तालुक्यातील आडस येथील राजकुमारी पितांबरसिंह पवार ( ८० ) या आजी भावकीतील लग्न सोहळ्याला परिवारासह उपस्थित होत्या. यानंतर तीन चार दिवसांनी त्यांच्यासह घरातील काही सदस्यांना त्रास सुरू झाला. यापूर्वीच सदरील लग्न सोहळ्यातील उपस्थितांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांनी १० एप्रिल रोजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केली असता आजी व घरातील दोन असे तिघे पॉझिटिव्ह आले. या सर्वांना लोखंडी सावरगाव येथील शासकीय कोविड सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले. येथे चार दिवसातच त्या ठणठणीत झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. मधुमेह, रक्तदाब असे आजार व वय ८० वर्ष असतानाही प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनाला हरविले.

Web Title: The 80-year-old grandmother lost to Corona in four days