बीडमध्ये पहिल्याच दिवशी ८ विद्यार्थी ‘रेस्टिकेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:58 IST2018-02-21T23:58:14+5:302018-02-21T23:58:18+5:30
बीड : बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाºया आठ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटची कारवाई पहिल्याच दिवशी करण्यात आली. अपवादात्मक घटना वगळता जिल्ह्यात इंग्रजीचा ...

बीडमध्ये पहिल्याच दिवशी ८ विद्यार्थी ‘रेस्टिकेट’
बीड : बारावीच्या परीक्षेत कॉपी करणाºया आठ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटची कारवाई पहिल्याच दिवशी करण्यात आली. अपवादात्मक घटना वगळता जिल्ह्यात इंग्रजीचा पहिला पेपर शांततेत व सुरळीत पार पडला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मंडळाच्या वतीने बुधवारपासून १२ वीच्या परीक्षेला सुरुवात झाली. जिल्ह्यातील ९० केंद्रांवर ३८ हजार ८३८ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आधीच नियोजन केलेले आहे. बुधवारी इंग्रजीचा पेपर सुरु झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी बीड शहरातील बलभीम व मिल्लिया महाविद्यालयात अचानक भेट दिली. तसेच माध्यमिकचे शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांनी अधिकाºयांकडून आढावा घेतला.
येथे झाली कारवाई
गेवराई तालुक्यातील मादळमोही - ३, आष्टी - १, बीड तालुक्यातील ढेकणमोहा - १, शिवणी - २, परळी तालुक्यातील सिरसाळा - १