कड्यात बनावट कांदा बियाणाच्या ७७ बॅग जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST2021-06-21T04:22:14+5:302021-06-21T04:22:14+5:30

पोलीस, कृषी विभागाची संयुक्त कारवाई : कृषी केंद्र चालक फरार लोकमत न्यूज नेटवर्क कडा : शहरातील धामणगाव रोडलगत थाटलेल्या ...

77 bags of fake onion seeds seized | कड्यात बनावट कांदा बियाणाच्या ७७ बॅग जप्त

कड्यात बनावट कांदा बियाणाच्या ७७ बॅग जप्त

पोलीस, कृषी विभागाची संयुक्त कारवाई : कृषी केंद्र चालक फरार

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : शहरातील धामणगाव रोडलगत थाटलेल्या कृषी सेवा केंद्रात कांद्याच्या बनावट बियाणांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला समजली होती. कृषी विभागाने शनिवारी पोलिसांच्या मदतीने या दुकानावर छापा टाकून कांदा बियाणांच्या ७७ बॅगा जप्त केल्या आहेत. या बियाणांची किंमत १ लाख रुपयांहून अधिक आहे.

आष्टी तालुक्यातील कडा शहरात धामणगाव रोडलगत गणेश तागड (रा. शिरापूर, ता. आष्टी) याच्या मालकीचे गजानन कृषी सेवा केंद्र आहे. याच कृषी सेवा केंद्रात बनावट कांदा बियाणाचा साठा असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली होती. शनिवारी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणनियंत्रक एस.डी. गरांडे व तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी आष्टी पोलिसांच्या मदतीने दुकानावर छापा टाकला. यावेळी दुकानात बनावट कांदा बियाणांच्या ७७ बॅग आढळून आल्या. एका बॅगची किमत १,४०० रुपये आहे. कृषी सेवा केंद्राचा चालक गणेश तागड हा पसार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. हे बनावट बियाणे त्याने कोठून आणले, किती शेतकऱ्यांना विकले, याचा तपास आष्टी पोलीस करीत आहेत.

===Photopath===

190621\1728nitin kmble_img-20210619-wa0068_14.jpg

===Caption===

कडा येथील कृषी सेवा केंद्रावर छापा टाकताना कृषी अधिकारी, पोलीस.

Web Title: 77 bags of fake onion seeds seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.