परळीतील ७० अतिक्रमित घरांवर हातोडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:28 IST2017-11-22T00:28:10+5:302017-11-22T00:28:24+5:30
बीड शहरातील मिलिंदनगर लगत असलेल्या सर्व्हे क्रमांक ७५ मधील १८ एकर जागेत २५ वर्षांपासून अतिक्रमणे केलेल्या १८७ पैकी ७० घरांवर (दुपारपर्यंत) पालिकेच्यावतीने हातोडा फिरविण्यात आला. यावेळी पालिकेसह पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.

परळीतील ७० अतिक्रमित घरांवर हातोडा!
बीड : शहरातील मिलिंदनगर लगत असलेल्या सर्व्हे क्रमांक ७५ मधील १८ एकर जागेत २५ वर्षांपासून अतिक्रमणे केलेल्या १८७ पैकी ७० घरांवर (दुपारपर्यंत) पालिकेच्यावतीने हातोडा फिरविण्यात आला. यावेळी पालिकेसह पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.
गेल्या पाच वर्षापासून अतिक्रमणे काढण्याचा इशारा दिला होता. याबाबत नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती, परंतु निकाल पालिकेच्याबाजूने लागला.
मुख्याधिकारी डॉ. बाबुराव बिक्कड, अभियंता आर.एच. बेंडले, कार्यालयीन अधीक्षक वामन जाधव, संतोष रोडे, स्वच्छता निरिक्षक श्रावणकुमार घाटे, मुक्ताराम घुगे, शंकर साळवे, अशोक दहीवडे, व्ही.बी. दुबे, व्ही.डी. स्वामी, सुदाम नरवडे, दत्ता भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमण्यात आली होती. तसेच बंदोबस्तासाठी शेकडो पोलीस तैनात होते. रहिवाशांनी स्वत: अतिक्रमणे हटविले. त्यामुळे कुठलाही अनुुचित प्रकार घडला नाही.