प्रभाग ११ ‘अ’ मध्ये ६०.६८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:47 IST2019-01-28T00:46:51+5:302019-01-28T00:47:15+5:30

शहरातील प्रभाग क्र. ११ अ मधील पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

60.68 percent voting in Division 11 'A' | प्रभाग ११ ‘अ’ मध्ये ६०.६८ टक्के मतदान

प्रभाग ११ ‘अ’ मध्ये ६०.६८ टक्के मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहरातील प्रभाग क्र. ११ अ मधील पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ६०.६८ टक्के मतदान झाले होते. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोमवारी मतमोजणी होणार आहे.
या पोट निवडणुकीत एका जागेसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या दहा दिवसात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रभाग पिंजून काढला. या निवडणूकीत राष्ट्रवादीकडून मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन, शिवसेनेकडून रेणूका मुकूंद भालेकर, एमआयएमच्या खान सगीरा बेगम रफिक अहेमद, काँग्रेसच्या शेख आयेशा बेगम मुसा तर शिवसंग्रामच्या खान सुमैय्या फिरदोस जाकेर खान या प्रमुख उमेदवारांसह उषा विक्रम ढाकणे (रोडरोलर) आणि शेख समीरा बेगम खमर (शिवणयंत्र) अशा सात उमेदवारांमध्ये लढत होत आहेत.

Web Title: 60.68 percent voting in Division 11 'A'