पात्रूडमध्ये सहा लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:29 AM2018-09-22T00:29:53+5:302018-09-22T00:31:03+5:30

तालुक्यातील पात्रुड येथे गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान एका खाजगी वाहनातून उतरविण्यात येत असलेला जवळपास सहा लाख रूपयांचा गुटखा जप्त केला. ही तसेच दोन भावांना ताब्यातही घेतले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके व त्यांच्या पथकाने केली.

6 lakh gutka seized in the bag | पात्रूडमध्ये सहा लाखांचा गुटखा जप्त

पात्रूडमध्ये सहा लाखांचा गुटखा जप्त

Next
ठळक मुद्देदोघे भाऊ ताब्यात : माजलगाव पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : तालुक्यातील पात्रुड येथे गुरुवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान एका खाजगी वाहनातून उतरविण्यात येत असलेला जवळपास सहा लाख रूपयांचा गुटखा जप्त केला. ही तसेच दोन भावांना ताब्यातही घेतले आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके व त्यांच्या पथकाने केली.
बंदी असूनही माजलगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होताना दिसत आहे. त्या अनुषंगाने पात्रुड येथे चोरट्या मार्गाने गुटखा आल्याची माहिती भाग्यश्री नवटके यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह एका खाजगी वाहनाने जाऊन सदरील ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी संबंधित जागा मालक मोमीन नयुम अब्दुल हमीद आपल्या भावाच्या घरासमोर रिकाम्या पत्राच्या शेडमध्ये चारचाकी गाडीतून गुटख्याच्या बॅगा उतरवत असल्याचे दिसून आले. त्याला गुटखा साठवणारा त्याचा भाऊ मोमीन मुस्तकीन अ. हमीद त्यावेळी मदत करत होता. संबंधित मुद्देमाल १८ लहान मोठ्या गोण्यांमध्ये दिसून आला. याची किंमत जवळपास सहा लाख रूपये असल्याचे सांगण्यात आले. यावेळी पोलिसांनी दोघांनाही वाहनासह ताब्यात घेतले. जप्त केलेला गुटखा माजलगाव ग्रामीण ठाण्यात जमा केला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. उशिरापर्यंत ग्रामीण ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई भाग्यश्री नवटके यांच्यासह पो.उप.निरीक्षक विकास दांडे, पो. ना. कळकेंद्रे, शैलेश गादेवार, नितीन राठोड, आशिशकुमार देशमुख आदींनी केली.

Web Title: 6 lakh gutka seized in the bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.