निपाणी जवळका आरोग्य केंद्रात ५७१ जणांना कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:35 IST2021-03-23T04:35:54+5:302021-03-23T04:35:54+5:30
तालुक्यात लसीकरण सुरू करण्याचा पहिला मान निपाणी जवळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला. त्यानंतर इतरही आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण ...

निपाणी जवळका आरोग्य केंद्रात ५७१ जणांना कोरोना प्रतिबंधक लस
तालुक्यात लसीकरण सुरू करण्याचा पहिला मान निपाणी जवळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला. त्यानंतर इतरही आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. येथे लसीकरण्यासाठी सुरुवातीस नोंदणी करून त्यानंतर प्रतीक्षा कक्षात बसविले जाते व नंबर येताच लस देऊन अर्धा तास निगराणी कक्षेत थांबवून घेतले जात आहे.
सध्या शिक्षक, पोलीस, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर तसेच ६० वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. १० मार्चपासून आतापर्यंत ५७१ जणांना ही लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. संदीप खाडे, आरोग्य उपकेंद्रातील डॉ. दहिफळे, डॉ. गोरे, डॉ. पवार, डॉ. अनिता निर्मळ, डॉ. सीमा सय्यद, डॉ. अस्मिता पालके, डॉ. अश्विनी गायकवाड यांच्या नियोजनाखाली लसीकरणाचे काम आरोग्य केंद्रात सुरू आहे.नागरिकांनी दर बुधवारी, गुरूवारी व शनिवारी कोरोना लसीकरण करावे असे आवाहन निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय माने यांनी केले आहे.
सेल्फी पॉइंटचे आकर्षण
येथील आरोग्य केंद्रात योग्य नियोजनात लसीकरण सुरू असून लस दिल्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने येथे उभारलेला सेल्फी पाॅईटही विशेष आकर्षण ठरत आहे. बहुतांश नागरिक लस घेतल्यानंतर या ठिकाणी उभारून स्वतःचा सेल्फी घेत आहेत.
टेस्ट न केल्यास कारवाई
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व्यापारी किंवा दुकानदारांनी कोरोनाची टेस्ट केली असेल तरच दुकाने उघडावीत कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल तर रिपोर्ट सोबत ठेवावा. जर रिपोर्ट जवळ नसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच व्यापारी दुकानदार यांनी पंधरा दिवसाला कोरोनाची टेस्ट करून घ्यावी अन्यथा कारवाई केली जाईल, असे निपाणी जवळका प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धनंजय माने यांनी सांगितले