५७ नवे रुग्ण, ८२ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:04+5:302021-09-04T04:40:04+5:30
जिल्ह्यात शुक्रवारच्या अहवालानुसार, एकूण २ हजार ८७३ जणांची कोरोना चाचणी केल्या गेली. यामध्ये २ हजार ८१६ जणांचा अहवाल निगेटिव्ह ...

५७ नवे रुग्ण, ८२ कोरोनामुक्त
जिल्ह्यात शुक्रवारच्या अहवालानुसार, एकूण २ हजार ८७३ जणांची कोरोना चाचणी केल्या गेली. यामध्ये २ हजार ८१६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ५७ जण बाधित आढळून आले. नव्या रुग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ३, आष्टी तालुक्यात २५, बीडमध्ये ५, धारुरमध्ये ४, गेवराईत २, केजमध्ये ३, माजलगावात ३, पाटोद्यात ५ आणि वडवणी तालुक्यात ५ बाधित आढळून आले. तसेच दिवसभरात ८२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख १ हजार ४४५ इतकी झाली असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९७ हजार ८६८ इतकी झाली आहे. आतापर्यंत २ हजार ७१५ जणांचा बळी गेला असून, सध्या ८६२ रुग्ण उपचाराखाली आहेत.