आष्टी तालुक्यातून ५६ मतदारांनी बजावला हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:32 IST2021-03-21T04:32:31+5:302021-03-21T04:32:31+5:30
आष्टी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ संचालकांच्या जागेसाठी शनिवारी येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयामध्ये मतदान शांततेत ...

आष्टी तालुक्यातून ५६ मतदारांनी बजावला हक्क
आष्टी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ संचालकांच्या जागेसाठी शनिवारी येथील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयामध्ये मतदान शांततेत पार पडले. तालुक्यातून एकूण १७५ पैकी ५६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत भाजप गटाने बहिष्कार टाकल्याने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भाजप समर्थक मतदार मतदान केंद्रांवर फिरकले नाहीत, त्यामुळे मतदानाचा आकडा वाढू शकला नाही.
तालुक्यातून १७५ मतदानापैकी ५६ मतदान झाले असल्याची माहिती मतदान केंद्राध्यक्ष एस.बी. पिंपळे यांनी दिली, तर आ. बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी, काकासाहेब शिंदे, किशोर हंबर्डे, बाळासाहेब गर्जे, राम खाडे, बाबासाहेब वाघुले, हनुमंत भिसे, डाॅ.जालिंदर वांढरे यांनी शेतकरी विकास पॅनलसाठी मतदारांना मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न केला. भाजप पक्षाने मतदानावर बहिष्कार टाकल्याने आष्टी तालुक्यातून १७५ पैकी किती मतदान होणार याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले होते.
===Photopath===
200321\img_20210320_124846_14.jpg