कमी किमतीत दुचाकी देण्याचे आमिष दाखवून ५५ हजारांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:02 IST2021-02-06T05:02:45+5:302021-02-06T05:02:45+5:30
येवता येथील दशरथ सोपान राऊत या तरुणास प्रल्हादसिंग पटेल (रा. पिंपरी चिंचवड) व विकास पटेल (रा. मध्य प्रदेश) या ...

कमी किमतीत दुचाकी देण्याचे आमिष दाखवून ५५ हजारांना गंडा
येवता येथील दशरथ सोपान राऊत या तरुणास प्रल्हादसिंग पटेल (रा. पिंपरी चिंचवड) व विकास पटेल (रा. मध्य प्रदेश) या दोघांनी ओएलएक्स अकाउंटवर शाइन एसपी कंपनीची दुचाकी २२ हजार रुपयांमध्ये देतो, असे आमिष दाखविले. त्यांनी राऊत यांच्याकडून ६ व ७ जानेवारी २०२१ या दोन दिवसांत फोन पे व गुगल पे अकाउंटवर ५५ हजार ९०० रुपये मागवून घेतले. राऊत यांनी त्यांच्याकडे दुचाकीची मागणी केली. मात्र, त्यांनी दुचाकी दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दशरथ राऊत यांनी केज पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून प्रल्हादसिंग पटेल व विकास पटेल या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीडच्या सायबर क्राइम पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.