शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासात मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला ५ वर्षे कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:56 IST

अल्पवयीन मुलगी तिच्या गावी जाताना चारचाकी वाहनात छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीला ५ वर्षे कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयाने सुनावली.

बीड : अल्पवयीन मुलगी तिच्या गावी जाताना चारचाकी वाहनात छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीला ५ वर्षे कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयाने सुनावली.गेवराई तालुक्यातील मुदापुरी येथील मुलगी शिकवणीसाठी गेवराईत आली होती. तिला व तिच्या मैत्रीणीला घरी नेण्यासाठी चुलते कार घेऊन आले होते. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुदापुरीकडे जाताना मोंढा नाक्यावर गावातील निवास उर्फ पप्पू गिरे व त्याचे वडील शंकर चारचाकी वाहनात बसले. या वाहनात आधीच बसलेल्या सदर मुलीची छेड काढून निवास गिरे याने लज्जास्पद कृत्य केले. त्यानंतर तिला व तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीने आरोपी हा पुन्हा अशी घटना करु शकतो हा विचार करुन गेवराई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. तपासी अंमलदार एस. व्ही पवार यांनी सविस्तर तपास करुन आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.या प्रकरणाची सुनावणी विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. सरकारी पक्षाच्या वतीने ६ साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी व इतर कागदोपत्री पुरावा, सहायक सरकारी अभियोक्ता बी. एस. राख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन विशेष जिल्हा व सत्र न्या. नाझेरा शेख यांनी आरोपी निवास गिरे यास कलम ८ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ५ वर्षे सश्रम कारावास आणि १० हजार रुपये आणि कलम ५०६ भादंविनुसार १ वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अभियोग पक्षातर्फे सहायक सरकारी वकील बी. एस. राख यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी मार्गदर्शन केले. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार धनवडे, पो. हे. कॉ. एस. डी. जाधव, महिला पो. शिपाई सिंगल यांनी सहकार्य केले.

टॅग्स :BeedबीडMolestationविनयभंगCourtन्यायालय