बीड मतदारसंघात ६ मतदान केंदे्र संवेदनशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:44 PM2019-10-20T23:44:41+5:302019-10-20T23:45:35+5:30

बीड विधानसभा मतदार संघात ३७४ केंद्रात मतदान होत असून ६ केंद्र संवेदनशील आहेत. तर १० केंद्रांवर स्टील कॅमेरे लावले असून ३८ केंद्रांचे वेबकास्टींग होणार आहे.

5 polling booths sensitive in Beed constituency | बीड मतदारसंघात ६ मतदान केंदे्र संवेदनशील

बीड मतदारसंघात ६ मतदान केंदे्र संवेदनशील

Next
ठळक मुद्दे१० केंद्रांवर स्टील कॅमेरे ठेवणार नजर : ३८ केंद्रांची वेबकास्टिंग; पहाटे साडेपाचला मॉकपोल

बीड : बीड विधानसभा मतदार संघात ३७४ केंद्रात मतदान होत असून ६ केंद्र संवेदनशील आहेत. तर १० केंद्रांवर स्टील कॅमेरे लावले असून ३८ केंद्रांचे वेबकास्टींग होणार आहे. निवडणूक कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून १२० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना निवडणूक मतदान व मोजणीपर्यंतच्या काळात मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात वावरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी नामदेव टिळेकर यांनी ही माहिती दिली.
बीड विधानसभा मतदार संघात १ लाख ७८ हजार ७६८ पुरुष तर १ लाख ५६ हजार ३७९ स्त्री असे ३ लाख ३५ हजार १४७ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. यात ३ मतदार तृतीयपंथी आहेत. मतदार संघात एक सखी व एक मॉडेल मतदान केंद्र आहेत. निवडणूक कामकाजासाठी २२४४ कर्मचारी, अधिकारी नियुक्त केले असून त्यांचे तीन वेळा प्रशिक्षण झाले आहे. रविवारी सायंकाळपर्यंत ते नियुक्त केंद्रांवर पोहोचले.
आतापर्यंत सार्वजनिक ठिंकाणी विद्रुपीकरण केल्याप्रकरणी २ तर पैसे वाटल्याच्या प्रकरणा १ असे आचारसंहिता भंगाचे ३ गुन्हे दाखल करण्यात आल्याचे टिळेकर म्हणाले.
दरम्यान, मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर नियुक्त कर्मचारी तसेच साहित्य पोहोचले आहे. आयोगाच्या निर्देशानुसार २१ आॅक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता मॉकपोल होऊन ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ होणार असल्याचे तहसीलदार किरण अंबेकर यांनी सांगितले.
मतदार संघात ३७४ मतदान केंद्र असून १५०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या भागात ८ सहायकारी केंद्र करण्यात आले आहेत. मतदानासाठी ३७४ सीयु, ३७४ व्हीव्हीपॅट तर ११२२ बीयू उपलब्ध करण्यात आले आहेत. ७१ इव्हीएम राखीव ठेवले आहेत. आचारसंहिता पालन तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान ३ भरारी पथकांची नजर राहणार आहे, तसेच व्हिडीओ चित्रीकरण करणारे पथक नियुक्त केले आहे.

Web Title: 5 polling booths sensitive in Beed constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.