शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुख यांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या हत्यारांचा वापर; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:54 IST

सरपंच संतोष देशमुख यांच्या शरिरावर १५० जखमा आढळून आल्या होत्या.

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या शस्त्रांचा वापर करण्यात आला, असा परीक्षण अहवालात उल्लेख करण्यात आला. हा अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 

सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी वापरलेल्या चार हत्यारांचा परीक्षण अहवाल समोर आला, ज्यात गॅसचा पाईप, पाईपचा चाबूक, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईपचा समावेश आहे. या हत्यारांनी मारहाण झाली तर, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, असे अहवालात नमूद करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, आरोपींनी याआधी देखील इतर व्यक्तींना मारहाण करण्यासाठी याच हत्यारांचा वापर केल्याचे समजत आहे. हा अहवाल न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे, जो संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतो. 

याप्रकरणात आठ जणांना अटकयाप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह आठ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि त्यासंबंधित दोन प्रकरणांमध्ये सीआयडीने गेल्या महिन्यात बीड न्यायालयात १,२०० पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

वाल्मिक कराडकडून न्यायालयात याचिका दाखलसंतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडने बीड न्यायालयात आरोपातून मुक्तता मिळावी, यासाठी याचिका दाखल केली आहे. कराड यांच्याविरोधात कोणतेही प्राथमिक पुरावे नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून उत्तर मागितले आहे.

नेमके प्रकरण काय?मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचे सांगितले. पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रात देखील हा उल्लेख आहे. या हत्येचे पडसाद राज्यभरात उमटल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeedबीडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारी