३८८ अल्पवयीन मुली पळून गेल्या, यापैकी पोलिसांनी शोधल्या ३७६ जणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:27+5:302021-07-29T04:33:27+5:30

बीड : सोशल मीडियामुळे आता कुणालाही सहज व्यक्त होता येते. हे साधन अल्पवयीन व वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी अतिशय धोक्याचे ...

388 minor girls fled, of whom 376 were found by the police | ३८८ अल्पवयीन मुली पळून गेल्या, यापैकी पोलिसांनी शोधल्या ३७६ जणी

३८८ अल्पवयीन मुली पळून गेल्या, यापैकी पोलिसांनी शोधल्या ३७६ जणी

Next

बीड : सोशल मीडियामुळे आता कुणालाही सहज व्यक्त होता येते. हे साधन अल्पवयीन व वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी अतिशय धोक्याचे ठरत आहे. पूर्वी व्यक्त होण्याकरिता इतकी सहज साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे वयात येणाऱ्या मुला-मुलींमध्ये आकर्षणाचे प्रमाण तुलनेेने कमी होते. मागील काही वर्षांत अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. २०१८ ते २०२१ या चालू वर्षापर्यंत जवळपास ३८८ अल्पवयीन मुली पळून गेल्या तर, त्यापैकी जवळपास ३७६ जणींना शोधण्यास पोलीस प्रशासनाला यश आले आहे.

तरुणपणात होणारे बदल लक्षात घेत अशा काळात आई-वडिलांनी मुला-मुलींशी संवाद साधणे गरजेचे आहे. तसेच त्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे देणेदेखील गरजेचे आहे. यामुळे मुलांमध्ये समज निर्माण होऊन ते कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता घरातून पलायन करणार नाहीत, असे मत तज्ज्ञांकडून वर्तवले जात आहे.

अल्पवयीन मुली पळून गेल्याच्या घटना

२०१८ -- ९३

२०१९ -- ११९

२०२० --- १०७

२०२१ जून अखेर - ६९

मुली चुकतात कुठे?

उदाहरण १

मुलांची लाइफस्टाईल तसेच शारीरिक आकर्षणाला प्रेम समजून मुली आहारी जातात. त्यांच्या या भावनिकतेचा फायदा घेऊन फसवणूक केली जाते. तोपर्यंत प्रकरण हाताबाहेर गेलेले असते.

उहादहरण २

प्रेमप्रकरण जमल्यानंतर दोघांमधील खासगी गोष्टींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटो काढून मुलीला ब्लॅकमेल केले जाते. त्यामुळे मुलींनी सतर्क राहून असा प्रकार घडत असेल तर, पालकांशी संवाद साधणे गरजेचे आहे.

उदाहरण ३

स्वत:हून घरातून पळून जाण्यासाठी मुलाला आत्महत्येच्या धमक्या दिल्या, त्याच्यासोबत पळून गेली. नंतर संसाराच्या वास्तविकतेची जाणीव झाल्यावर फूस लावून पळविल्याचा आरोप केल्याचेदेखील समोर आले आहे.

मुला-मुलींचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र

आई-वडील व्यस्ततेमुळे किशोरवयीन मुला-मुलींना वेळ देत नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील संवाद कमी होतो व मुली इतरांकडे आकर्षित होतात.

त्यामुळे पालकांनी मुलांसोबत मैत्रीपूर्ण नाते ठेवत त्यांच्यासोबत गप्पा माराव्यात तसेच त्यांच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातून असे प्रकार टाळण्यास मदत होऊ शकते.

Web Title: 388 minor girls fled, of whom 376 were found by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.