अंबाजोगाईत चार दिवसात ३५१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST2021-03-27T04:35:13+5:302021-03-27T04:35:13+5:30

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असून, शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्याने कोरोना रुग्णांचा शंभर आकडा पार केला. गेल्या ...

351 patients in four days in Ambajogai | अंबाजोगाईत चार दिवसात ३५१ रुग्ण

अंबाजोगाईत चार दिवसात ३५१ रुग्ण

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात दररोज कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असून, शुक्रवारी अंबाजोगाई तालुक्याने कोरोना रुग्णांचा शंभर आकडा पार केला. गेल्या चार दिवसात कोरोनाचे नवीन ३५१ रुग्ण तालुक्यात सापडले आहेत. गेल्या आठ महिन्यात अंबाजोगाई तालुक्यातील हा आकडा सर्वोच्च आहे. अंबाजोगाई तालुक्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंबाजोगाई तालुक्यात जुलै महिन्यापासून कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली. पहिला रुग्ण जुलैमध्ये सापडला होता. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांचा आलेख वाढतच राहिला. गेल्या आठ महिन्यांत अंबाजोगाई तालुक्यात ३,५००पेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले. मार्च महिन्यात तर कोरोनाच्या रुग्णांनी अंबाजोगाई तालुक्यात उच्चांक गाठला. या महिन्यातील रुग्णसंख्या हजारांच्या आसपास पोहोचते की काय? अशी भीषण स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार दिवसात कोरोनाचे ३५१ रुग्ण आढळले आहेत तर शुक्रवारी आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा म्हणजे कोरोना रुग्णांनी अंबाजोगाई तालुक्यात शंभरी गाठली आहे. कोरोना रुग्णांची ही वाढती संख्या अंबाजोगाई तालुक्यातील रहिवाशांसाठी चिंताजनक ठरू लागली आहे. सध्या लॉकडाऊन सुरु असले तरी नागरिकांना कोरोनाच्या त्रिसुत्रीचा अवलंब करून सुरक्षितता बाळगण्यावर मोठा भर द्यावा लागणार आहे. तरच या वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसेल अन्यथा नागरिकांनी कोरोना नियमांचे तंतोतंत पालन न केल्यास पुन्हा कोरोनाचा आकडा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

Web Title: 351 patients in four days in Ambajogai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.