शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

बीड पालिकेचा ३२२ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:14 AM

कोणतीही करवाढ न करता २०१९-२० या वर्षाकरिता शहर विकासाठी ३२२ कोटी ४२ लाख ५० हजार रुपयांचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहूमताने मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकारपरिषेदत दिली.

ठळक मुद्देभारतभूषण क्षीरसागर यांची पत्र परिषद : २२ वर्षांपासून करवाढ न करणारी एकमेव नगर परिषद

बीड : कोणतीही करवाढ न करता २०१९-२० या वर्षाकरिता शहर विकासाठी ३२२ कोटी ४२ लाख ५० हजार रुपयांचा अर्थसंकल्प नगरपालिकेत बहूमताने मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी गुरुवारी पत्रकारपरिषेदत दिली. नागरिकांना मुलभूत सुविधांसह बीड शहराची गणणा स्मार्ट सिटीमध्ये व्हावी यासाठी या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही करवाढ न करता भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मागील २२ वर्षापासून करवाढ न करणारी राज्यातील एकमेव नगरपालिका असल्याचे देखील क्षीरसागर म्हणाले.यावेळी नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर म्हणाले, योजना पूर्ण करण्यासाठी पाच वर्षाचा कार्यकाळ असतो, मात्र आपण या योजना फक्त दोन वर्षात पूर्ण करत आहोत. त्यामुळे बीड शहर हे स्वच्छ, सुंदर व सुविधायुक्त होणार आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या अमृत अटल योजना, भूयारी गटार योजनांचा शुभारंभ केलेला आहे. तसेच रस्त्यांचे देखील बांधकाम हाती घेण्यात आलेले आहे.अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर बीडकरांना मुबलक पाणी मिळणार असून पाणीचोरी पूर्णपणे थांबणार आहे. शहरात स्वच्छता, रस्त्यावरील खड्डे व नवीन रस्त्यांचे बांधकाम, विद्युत पुरवठा व पाणीपुवठा सुरळीत करण्यात येणार आहे. तसेच उद्यान निर्मिती व सुशोभिकरण, काही ठिकाणी ओपन जीमसह इतर सुविधा देण्यासाठी देखील विशेष तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे.बीड शहर स्वच्छता सर्वेक्षणात देशभरातून १०९ व्या क्रमांकावर आले आहे. अंबिकापूर मॉडल शहरात राबवणार असून, शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नावर शाश्वत उपाययोजना करण्यात येणार असल्याचे देखील डॉ.क्षीरसागर यावेळी म्हणाले. तसेच नगरपालिकेतील राजकीय पक्ष एमआयएम, शिवसेना व भाजप नगरसेवकांनी अर्थसंकल्पास पाठींबा दिल्याबद्दल यांनी त्यांचे अभार देखील मानले व मधल्या काळात विरोधी पक्षातील काही जणांकडून विकासकामांना खिळ घालण्याचे काम केले होते. तसेच नगर परिषदेचे काम करणाऱ्या कंत्राटदारासोबत ‘सेटलमेंट’ न झाल्यामुळे बदनामी देखील विरोधकांकडून करण्यात आली होती, असा आरोप डॉ. क्षीरसागर यांनी यावेळी केला. मात्र आता संख्याबळ आपल्या बाजूने असल्यामुळे विकासकामांना गती मिळणार असल्याचे देखील डॉ.क्षीरसागर यावेळी म्हणाले.यावेळी पत्रकार परिषदेत सभापती मुखीद लाला, नगरसेवक विनोद मुळूक, अ‍ॅड. विकास जोगदंड, गटनेते सय्यद सादेक अली, किशोर पिंगळे, मोहम्मद सादेक, किशोर काळे, भीमराव वाघचौरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडMuncipal Corporationनगर पालिकाBudget 2019अर्थसंकल्प 2019