दोन दिवसांत ३० हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:31 IST2021-04-12T04:31:36+5:302021-04-12T04:31:36+5:30

बीड : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून, संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला ...

30,000 fine recovered in two days | दोन दिवसांत ३० हजारांचा दंड वसूल

दोन दिवसांत ३० हजारांचा दंड वसूल

बीड : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून, संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासनाकडून शनिवार आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला होता. या कालावधित विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी नगरपालिका व महसूलच्या पथकासोबत दंडात्मक करावाई केली. दोन दिवसांत जवळपास जिल्ह्यात ३० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.

कोरोना संसर्ग वाढत असून, जिल्हाधिकारी यांनी निर्बंध घातले आहेत. रविवारी आणि शनिवारी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. दोन दिवसांत बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे तर, विनामास्क फिरणाऱ्यांवरदेखील नगरपालिका व महसूल प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. या दोन दिवसांत महसूल व नगरपालिकेच्या वतीने जिल्हाभरात ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, बीड शहर वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी करत विनामास्क फिरणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांना मास्क खरेदी करण्यास सांगून कायम मास्क वापरण्याची समज दिली आहे.

मास्कचा वापर न करणाऱ्यांवर होणार कारवाई

मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना विनामास्क फिरल्यास कारवाई करण्यात येत आहे. तर, शनिवारी आणि रविवारी विनाकारण फिरणाऱ्यांवर महसूल व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत वाहतूक पोलीस संयुक्त दंडात्मक कारवाई करत आहे. तसेच मास्क वापरण्यासंदर्भात जनजागृतीदेखील करण्यात येत आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस प्रमुख कैलास भारती यांनी दिली.

दवाखान्याचे कारण सांगून फिरणारे अधिक

शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत नागरिकांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला. तसेच दुचाकी किंवा इतर वाहनांमधून फिरणाऱ्यांची विचारपूस केली जात होती. यावेळी अनेकजण दवाखान्याचे कारण पुढे करत होते. त्यासंदर्भातील काही कागदपत्रे आहेत का? याची तपासणी केली जात होती. अन्यथा समज देऊन व दंडात्मक कारवाई केली जात होती.

===Photopath===

110421\11_2_bed_16_11042021_14.jpg

===Caption===

बीड शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करताना नगरपालिका कर्मचारी व समजून सांगताना वाहतूक शाखा प्रमुख कैलास भारती 

Web Title: 30,000 fine recovered in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.