३० अधिकारी, कर्मचारी, तर ७० ग्रामसेवकांची झाली तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST2021-03-08T04:31:08+5:302021-03-08T04:31:08+5:30
त्या अनुषंगाने आष्टी पंचायत समिती अंतर्गत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी ६ मार्च रोजी आष्टी पंचायत समिती सभागृहात करण्यात आली आहे. ...

३० अधिकारी, कर्मचारी, तर ७० ग्रामसेवकांची झाली तपासणी
त्या अनुषंगाने आष्टी पंचायत समिती अंतर्गत कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी ६ मार्च रोजी आष्टी पंचायत समिती सभागृहात करण्यात आली आहे. आष्टी पंचायत समिती कार्यालयातील सर्व कर्माचाऱ्यांची आरोग्य तपासणी ६ मार्च रोजी सकाळी १० ते ५ या सुमारास आष्टी पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आली. यामध्ये बी.पी., शुगर, रक्तगट, हिमोग्लोबीन या तपासण्या करण्यात येत असून, ७० ग्रामसेवक, ३० कर्मचारी, अधिकारी यांची तपासणी करण्यात आली आहे. या आरोग्य तपासणीसाठी समुदाय आरोग्य अधिकारी प्रतापसिंह डफळे, डाॅ. सचिन पाळवदे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नागेश करांडे, आरोग्य सेवक परसराम सानप, तात्यासाहेब धोंडे, जीवन राठोड, नवनाथ गर्जे, आरोग्य सेविका विजया जोशी, व्ही. एस. घुगे, टी. डी. तांबोळी, आदी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
070321\img-20210306-wa0337_14.jpg