२६ नवे रुग्ण, ३४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:27 IST2021-02-05T08:27:06+5:302021-02-05T08:27:06+5:30
जिल्ह्यात शनिवारी एकूण ७२८ जणांच्या कोरोना चाचण्या केल्या. यात ७०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ...

२६ नवे रुग्ण, ३४ कोरोनामुक्त
जिल्ह्यात शनिवारी एकूण ७२८ जणांच्या कोरोना चाचण्या केल्या. यात ७०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यातील ३, आष्टीतील २, गेवराईतील ४, केजमधील २, परळीतील १, शिरुरमधील ३, बीड आणि धारुर तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १७ हजार ८०३ इतका झाला आहे. यापैकी १६ हजार ९९० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ५५४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ९७ हजार ९६३ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील १ लाख ८० हजार १६० जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आलेले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली.