मोफत पाठ्यपुस्तक वाहतुकीचे अडीच कोटी मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:41+5:302021-06-17T04:23:41+5:30
बीड : समग्र शिक्षा अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षापासून मोफत पाठ्यपुस्तक योजनेच्या तालुकास्तर ते शाळास्तर वाहतुकीचा निधी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त ...

मोफत पाठ्यपुस्तक वाहतुकीचे अडीच कोटी मिळाले
बीड : समग्र शिक्षा अभियानांतर्गत गेल्या तीन वर्षापासून मोफत पाठ्यपुस्तक योजनेच्या तालुकास्तर ते शाळास्तर वाहतुकीचा निधी संघटनेच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाला आहे. बीड तालुक्यासह जिल्ह्यातील मुख्याध्यापकासह केंद्र प्रमुखांनी झालेला खर्च गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती व केंद्रप्रमुख संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
मागील तीन वर्षापासून शासनाच्यावतीने पुरविण्यात येत असलेल्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेतील तालुकास्तर ते शाळास्तर वाहतुकीचा निधी मिळाला नव्हता. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक व पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात संघटनेने राज्यस्तरावर पाठपुरावा केल्यामुळे दोन वर्षांपूर्वीचा निधी यावर्षी जिल्ह्याला मिळाला आहे.
असा मिळाला निधी...
बीड तालुक्यासाठी सन २०१९-२० या वर्षासाठी रुपये १ कोटी २९ लाख ९८४ रुपये, तर २०२०-२१ या वर्षासाठी १ कोटी २९ लाख ९८४ रुपये अशी एकूण २ कोटी ५९ लाख ९६८ रुपये एवढी रक्कम मिळाली आहे. तालुक्यातील मुख्याधापक व केंद्रप्रमुखांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करून झालेल्या खर्चाचा निधी प्राप्त करून घ्यावा, असे आवाहन शिक्षक समिती व केंद्रप्रमुख संघटनेने केले आहे.