लोकन्यायालयात बीड जिल्हयातून २४२२ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2023 14:36 IST2023-12-10T14:36:41+5:302023-12-10T14:36:51+5:30
एकूण २४२२ प्रककणे निकाली निघाली आहेत. १५ कोटी २६ लाख ४१ हजार ६६४ एवढ्या रकमेची प्रकरणे निकाली निघाली आहेत.

लोकन्यायालयात बीड जिल्हयातून २४२२ प्रकरणे निकाली
बीड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्या. आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ९ डिसेंबर रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयातबीड जिल्हयातून एकूण २४२२ प्रकरणे निकाली निघाली आहेत. बीड जिल्हयातून एकूण २७ हजार १३४ दिवाणी व फौजदारी, मोटार अपघात, भुसंपादनाची प्रलंबित प्रकरणे ठेवली होती. त्यापैकी ७३७ प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर दाखलपुर्व २१८८९ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १६८५ प्रकरणे निकाली निघाली आहेत. अशी एकूण २४२२ प्रककणे निकाली निघाली आहेत. १५ कोटी २६ लाख ४१ हजार ६६४ एवढ्या रकमेची प्रकरणे निकाली निघाली आहेत.
लोक न्यायालयात जिल्हा न्या. १ एस.आर.पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. जी. सोनी, सदस्य सचिव, पाटवदकर , जिल्हा न्या.२, आर. एस. पाटील, जिल्हा न्या.४ एस.टी.डोके, जिल्हा न्या.५, दिवाणी न्या. व.स्तर एस.एस. पिंगळे, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. जोशी, सह दिवाणी न्या.व. स्तर एफ.बी.बेग, पाचवे सह दिवाणी न्या. व. स्तर आर.डी. गवई, चौथे सह दिवाणी न्या.क.स्तर पी.डी. चव्हाण, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष पी.एस. राजापूरकर, उपाध्यक्ष ॲड. दादासाहेब तांगडे, सचिव ॲड. एकनाथ काकडे, सह सचिव ॲड. विठ्ठल शेळके, कोषाध्यक्ष ॲड. आनंद कुलकर्णी, ग्रंथपाल सचिव ॲड. शेख इम्रान खाजा, महिला प्रतिनिधी ॲड. सायली सुतार, जिल्हा सरकारी वकील ॲड. अजय राख व सर्व सरकारी अभियोक्ता प्रामुख्याने उपस्थित होते.
पॅनल सदस्य म्हणून ॲड. संदिप पाटील, ॲड. छाया वाघमारे, ॲड. संगिता भुतावळे, ॲड. सुधिर कराड, ॲड. दिनेश नाटकर, ॲड.अक्षय महामुनी, ॲड. नागेश तांबारे, ॲड.विष्णू शिंदे यांनी काम पाहिले. न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, बॅंक कर्मचारी, पोलीस कर्मचारी व इतर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.