शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

पंचायत समितींकडे २४० टँकरचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:31 IST

यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आल आहे. ग्रामीण भागात देखील दुष्काळाची दाहकता दिसू लागली आहे. पाण्यासाठी नागिराकना पायपीट करावी लागतेय. गावाच्या जवळपास पाणी नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडे २४० टँकरचे प्रस्ताव आले आहेत.

ठळक मुद्देदुष्काळाची दाहकता वाढली : नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टंचाई आराखडा तयार करण्यात आल आहे. ग्रामीण भागात देखील दुष्काळाची दाहकता दिसू लागली आहे. पाण्यासाठी नागिराकना पायपीट करावी लागतेय. गावाच्या जवळपास पाणी नसल्यामुळे जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांकडे २४० टँकरचे प्रस्ताव आले आहेत.बीड जिल्ह्यात १ हजार ३१ ग्रामपंचायती आहे. तर गावे, वाड्या, वस्त्या, तांडे यांची संख्या मिळून १५०० गावे आहेत. त्यापैकी अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा व सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. आतापर्यत पंचायत समितींकडे २४० च्या जवळपास टँकरचे प्रस्ताव आले असून, हे प्रस्तावर प्रशासकीय मंजुरीसाठी तहसीलकडे पाठवण्यात आले आहेत,जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये जवळपास दुष्काळाची दाहकता जाणवू लागली आहे. जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होऊ लागला आहे. काही ठिकाणी बोअर, विहिरीला पाणी आहे, मात्र हे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी नागरिकांना मोठी पायपीट करावी लागत आहे.ज्या गावांमध्ये पाण्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांनी टँकरची मागणी पंचायत समितीकडे पाठवली आहे. हे प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करुन ्पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्तांनी केली आहे. तसेच जिल्हापरिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेमार्फत गावामधील हातपंप, पाणी असलेले शासकीय बोअर दुरुस्ती करावी, जेणेकरुन या बंद असलेल्या स्त्रोताचा वापर सर्वांना करता येईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. तसेच नागरिकांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोहयो अंतर्गत कामे सुरू करण्याची मागणी देखील नागरिकांमधून होऊ लागली आहे.तालुका टँकर प्रस्तावबीड १६अंबाजोगाई ८४परळी ५०गेवराई २७आष्टी २९माजलगाव ४शिरुर २६पाटोदा २धारुर २केज ०वडवणी ०एकूण २४०

टॅग्स :Beedबीडpanchayat samitiपंचायत समितीwater shortageपाणीटंचाई