जन शिक्षण संस्थांनच्या २२५ प्रशिक्षणार्थींची मोफत एच.आय.व्ही. टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:25 IST2021-02-05T08:25:25+5:302021-02-05T08:25:25+5:30
जन शिक्षण संस्थानचे शहरात २४ प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यापैकी खासबाग, तेलगाव नाका, भाग्यनगर, बांगरणाला, प्रकाश आंबेडकर नगर, क्रांती नगर, ...

जन शिक्षण संस्थांनच्या २२५ प्रशिक्षणार्थींची मोफत एच.आय.व्ही. टेस्ट
जन शिक्षण संस्थानचे शहरात २४ प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यापैकी खासबाग, तेलगाव नाका, भाग्यनगर, बांगरणाला, प्रकाश आंबेडकर नगर, क्रांती नगर, हनुमान नगर, जन शिक्षण कार्यालय, शाहूनगर शहंशहा नगर, बलभीम नगर व अंकुश नगर या १३ प्रशिक्षण केंद्रावर हे शिबिर घेण्यात आले. शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयातील खाशी इनामदार, जनार्दन माचपल्ले, सुनील गायकवाड, अमोल घोडके, एम. एस. इंगळे व जावेद शेख इत्यादींनी एच आय व्ही. एड्स, क्षयरोग व कोविड याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करून रॅपिड चाचणी केली. प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रावर नि:शुल्क एचआयव्ही टेस्ट करण्यात येऊन तिथेच अहवाल दिल्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थींनी आनंद व समाधान व्यक्त केले. शिबिरांमध्ये प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शनही काही प्रशिक्षण केंद्रावर आयोजित करण्यात आले होते. रांगोळ्यांच्या माध्यमातूनही आरोग्याचा संदेश देण्यात आला होता.
संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी, सीमा मनुरकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, सुदाम पालकर, स्वाती जैन, धर्मराज जाडकर तसेच स्नेहल केवडकर, सुमेधा मनसबदार आदी अधिकारी व कर्मचारी आणि रुही तरन्नुम,निशा पठाण, माधुरी कांबळे, ज्योती वीर, दैवशाला घोडके, करुणा चांदणे, पुनम चांदणे, श्रुती थिगळे, बालाजी शिंदे, प्रसाद कुलकर्णी, अनिस फतेमा,मीरा घोडके, कौसर शेख, प्रमिला जैन व शुभांगी झेंड या प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.