जन शिक्षण संस्थानच्या २२५ प्रशिक्षणार्थींची मोफत एच.आय.व्ही. टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:50+5:302021-02-05T08:23:50+5:30
बीड : कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारद्वारा वित्त पोषित व दीनदयाल शोध संस्थान संचलित, जन शिक्षण संस्थानद्वारा ...

जन शिक्षण संस्थानच्या २२५ प्रशिक्षणार्थींची मोफत एच.आय.व्ही. टेस्ट
बीड : कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारद्वारा वित्त पोषित व दीनदयाल शोध संस्थान संचलित, जन शिक्षण संस्थानद्वारा बीड शहरातील १३ प्रशिक्षण केंद्रावर १२ ते ३० जानेवारी दरम्यान जीवन समृद्धात्मक शिक्षण अंतर्गत ‘आरोग्य’ या विषयावर एच.आय. व्ही. जनजागृती व चाचणी तसेच क्षयरोग व कोविड याविषयी जनजागृती शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकूण २६० प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून, २२५ प्रशिक्षणार्थींनी चाचणी करून घेतली. सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून, शिबिर जिल्हा रुग्णालय बीडच्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र यांच्या सहकार्याने घेण्यात आले. जन शिक्षण संस्थानचे शहरात २४ प्रशिक्षण केंद्र आहेत. त्यापैकी खासबाग, तेलगाव नाका, भाग्यनगर, बांगरनाला, प्रकाश आंबेडकरनगर, क्रांतीनगर, हनुमाननगर, जन शिक्षण कार्यालय, शाहूनगर शहंशहानगर, बलभीमनगर व अंकुशनगर या १३ प्रशिक्षण केंद्रावर हे शिबिर घेण्यात आले. शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयातील खाशी इनामदार, जनार्दन माचपल्ले, सुनील गायकवाड, अमोल घोडके, एम. एस. इंगळे व जावेद शेख इत्यादींनी एच आय व्ही. एड्स, क्षयरोग व कोविड याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करून रॅपिड चाचणी केली. प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रावर नि:शुल्क एचआयव्ही टेस्ट करण्यात येऊन तिथेच अहवाल दिल्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थींनी आनंद व समाधान व्यक्त केले. शिबिरामध्ये प्रशिक्षणार्थींनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शनही काही प्रशिक्षण केंद्रावर आयोजित करण्यात आले होते. रांगोळ्यांच्या माध्यमातूनही आरोग्याचा संदेश देण्यात आला होता.
संस्थानचे संचालक गंगाधर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अभियान यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी सीमा मनुरकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुदाम पालकर, स्वाती जैन, धर्मराज जाडकर तसेच स्नेहल केवडकर, सुमेधा मनसबदार आदी अधिकारी व कर्मचारी आणि रुही तरन्नुम,निशा पठाण, माधुरी कांबळे, ज्योती वीर, दैवशाला घोडके, करुणा चांदणे, पूनम चांदणे, श्रुती थिगळे, बालाजी शिंदे, प्रसाद कुलकर्णी, अनिस फतेमा,मीरा घोडके, कौसर शेख, प्रमिला जैन व शुभांगी झेंड या प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.