२२४ नवे रुग्ण, १५९ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:24 IST2021-06-18T04:24:05+5:302021-06-18T04:24:05+5:30
जिल्ह्यात बुधवारी ३,४२४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. प्राप्त अहवालानुसार यात २२४ जण बाधित आढळले तर ३,२०० जणांचे ...

२२४ नवे रुग्ण, १५९ कोरोनामुक्त
जिल्ह्यात बुधवारी ३,४२४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. प्राप्त अहवालानुसार यात २२४ जण बाधित आढळले तर ३,२०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १८, आष्टी ४३, बीड ३०, धारुर ८, गेवराई २८, केज ३४, माजलगाव ६, परळी २०, पाटोदा ११, शिरुर १७ व वडवणी तालुक्यातील ९ रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा ९० हजार ३७ इतका झाला असून यापैकी ८६ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २४ तासात आठ मृत्यूची नोंद झाली. यामध्ये कासारी (ता. धारुर) येथील ७० वर्षीय पुरुष, उमराई (ता. केज) येथील ४७ वर्षीय पुरुष, अंबाजोगाईतील शाहूनगरातील ३० वर्षीय महिला, वाहेगाव (ता. गेवराई) येथील ४८ वर्षीय पुरुष, परळी तालुक्यातील पिंप्री (बु.) येथील ४२ वर्षीय पुरुष, देवगाव (ता. केज) येथील ४६ वर्षीय पुरुष, अंबाजोगाईतील ६५ वर्षीय पुरुष व धारुर येथील प्रतिभा नगरातील ६५ वर्षीय पुरुष यांचा मृतात समावेश आहे. एकूण बळींचा आकडा २ हजार ४०७ इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार ३७१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.