डोंगरी भागासाठी कडूलिंबाचे २०० सीडबाॅल तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:41+5:302021-06-02T04:25:41+5:30

शिरूर कासार : पावसाळा सुरू होताच वृक्षलागवड मोहीम सुरू होत असते. या अनुषंगाने नगरपंचायतीने वृक्षलागवडीचे बियाणे घालून मातीचे जवळपास ...

200 neem seedballs ready for hilly areas | डोंगरी भागासाठी कडूलिंबाचे २०० सीडबाॅल तयार

डोंगरी भागासाठी कडूलिंबाचे २०० सीडबाॅल तयार

शिरूर कासार : पावसाळा सुरू होताच वृक्षलागवड मोहीम सुरू होत असते. या अनुषंगाने नगरपंचायतीने वृक्षलागवडीचे बियाणे घालून मातीचे जवळपास दोनशे सीडबाॅल तयार केले आहेत. हे सीडबॉल ते डोंगरी भागात टाकले जाणार असल्याचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले.

सध्या नगर पंचायतच्या वतीने विविध बियांचे सीडबाॅल तयार करण्यात येत असून कडूलिंबाच्या दोनशे बिया टाकून सीडबाॅल तयार केले आहेत. ते सर्व डोंगरी भागात टाकण्यात येणार आहेत. पावसाळ्यात डोंगराळ भागात विविध बियाणे टाकून वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षलागवड सप्ताह आयोजित करण्यात येत असून नागरिकांनी या सप्ताहात मोठा सहभाग घ्यावा. प्रत्येकाने माणसी एक झाड तरी लावून त्याचे संगोपन करावे व हरित धरणीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्याधिकारी सानप यांनी केले.

===Photopath===

010621\01bed_10_01062021_14.jpg

Web Title: 200 neem seedballs ready for hilly areas