सीना नदीपात्रातून वाळू उपसा करणारे २ जेसीबी ४ ट्रॅक्टर जप्त ; पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:22 IST2021-02-05T08:22:04+5:302021-02-05T08:22:04+5:30
१२ जणांविरुद्ध आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे ...

सीना नदीपात्रातून वाळू उपसा करणारे २ जेसीबी ४ ट्रॅक्टर जप्त ; पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कामगिरी
१२ जणांविरुद्ध आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यामध्ये ४ ट्रॅक्टर, दोन जेसीपी, पोलिसांनी जप्त केले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोन आरोपी फरार आहेत तर सहा वाहनमालक अशा एकूण बारा जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत सोमवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती या पथकाचे प्रमुख विलास हजारे यांनी दिली.
आष्टी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सीना नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने या टाकळसिंग जवळच्या सीना नदीपात्रात छापा टाकून दोन जेसीबी आणि चार ट्रॅक्टर जप्त केले आहे. यामध्ये बाळू तुकाराम देवकते, सुभाष बाळासाहेब वाल्हेकर, श्रीराम ज्ञानदेव जगताप, गणेश सुनील श्रीगंधे, यांच्यावर आष्टी पोलिसांत विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पथकाने ४ ट्रॅक्टर ३ ब्रास वाळू किमंत २४,४५,००० रुपये ,आणि २ जेसीबी किंमत २३ लाख असा एकूण ४७,४५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे करत आहेत.