१९ कोरोनाबळी; १३४६ नवे रुग्ण, तर ९२० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:25 IST2021-04-29T04:25:59+5:302021-04-29T04:25:59+5:30
तृतीयपंथीसह १९ मृत्यू २० ते २८ एप्रिल दरम्यान झालेल्या १९ जणांच्या मृत्यूची नोंद बुधवारी आरोग्य विभागाच्या आयसीएमआर पोर्टलवर करण्यात ...

१९ कोरोनाबळी; १३४६ नवे रुग्ण, तर ९२० कोरोनामुक्त
तृतीयपंथीसह १९ मृत्यू
२० ते २८ एप्रिल दरम्यान झालेल्या १९ जणांच्या मृत्यूची नोंद बुधवारी आरोग्य विभागाच्या आयसीएमआर पोर्टलवर करण्यात आली. यात बीड तालुक्यातील ४८ वर्षीय पुरुष, गेवराई तालुक्यातील रेवकी येथील ६५ वर्षीय तृतीयपंथी, केंद्रेवाडी (ता. अंबाजोगाई) येथील ८० वर्षीय पुरुष व ७५ वर्षीय महिला, धारुर तालुक्यातील असोला येथील ७० वर्षीय पुरुष, लातूर जिल्ह्यातील तत्तपूर येथील ७९ वर्षीय महिला, माजलगाव तालुक्यातील आालापूर येथील ३८ वर्षीय पुरुष, बीड तालुक्यातील नेकनूर येथील ६५ वर्षीय महिला, कुक्कडगाव येथील ५० वर्षीय पुरुष, जळगाव येथील ५२ वर्षीय पुरुष, राजापूर (ताग़ेवराई) येथील २६ वर्षीय पुरुष, हिंगणी येथील ३५ वर्षीय पुरुष, बीड तालुक्यातील कुंभारी येथील ७५ वर्षीय पुरुष, निरगुडी येथील ७३ वर्षीय महिला, बीडमधील पाटांगणकर गल्ली येथील ५५ वर्षीय महिला, आझादनगरातील ७७ वर्षीय पुरुष, परळी येथील ३८ वर्षीय पुरुष, मांडवा (ता. बीड) येथील ७४ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. एकूण बळींचा आकडा ८८४ इतका झाला आहे.