१७६ नवे रूग्ण, १२० कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:57+5:302021-06-26T04:23:57+5:30

जिल्ह्यात गुरुवारी ३ हजार ७८६ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले. यात १७६ पॉझिटिव्ह ...

176 new patients, 120 coronary free | १७६ नवे रूग्ण, १२० कोरोनामुक्त

१७६ नवे रूग्ण, १२० कोरोनामुक्त

जिल्ह्यात गुरुवारी ३ हजार ७८६ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले. यात १७६ पॉझिटिव्ह तर ३ हजार ६१० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ३, आष्टी ६३, बीड १३, धारुर ३, गेवराई २४, केज १४, माजलगाव ६, परळी ४, पाटोदा २८, शिरुर १५ व वडवणी तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा ९१ हजार २६७ इतका झाला असून यापैकी ८७ हजार ५४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान २४ तासात ८ व जुने ३ अशा ११ मृत्यूची नोंद झाली. यात शिवाजीनगर माजलगाव येथील ४० पुरुष, भोगलवाडी (ता .धारुर) येथील ७० वर्षीय पुरुष, बर्दापूर (ता. अंबाजोगाई) येथील ९० वर्षीय महिला, नागझरी (ता. बीड) ४२ वर्षीय महिला, खोकळवाडी (ता. आष्टी) येथील ६८ वर्षीय पुरुष, देवीनिमगाव (ता. आष्टी) येथील ६१ वर्षीय महिला, शहाजानपूर (ता. माजलगाव) येथील ७४ वर्षीय महिला व कामखेडा (ता. बीड) येथील ४५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. आता एकूण बळींचा आकडा २ हजार ४७८ इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Web Title: 176 new patients, 120 coronary free