१६५ नवे रुग्ण, १६५ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:31+5:302021-06-17T04:23:31+5:30

जिल्ह्यात बुधवारी २ हजार ८९५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात १६५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर, २,७३० जणांचा ...

165 new patients, 165 coronary free | १६५ नवे रुग्ण, १६५ कोरोनामुक्त

१६५ नवे रुग्ण, १६५ कोरोनामुक्त

जिल्ह्यात बुधवारी २ हजार ८९५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात १६५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर, २,७३० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्या रुग्णांमध्ये अंबाजोगाईत ०५, आष्टी तालुक्यात २९, बीडमध्ये २५, धारुरमध्ये ०४, गेवराईत २०, केजमध्ये २८, माजलगावात ०६, परळीत १४, पाटोद्यात ०७, शिरुरमध्ये २२ आणि वडवणीत ०५ असे नवे रुग्ण आढळून आले. तर, २४ तासात चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील २७ वर्षीय पुरुष, बीड तालुक्यातील घोसापुरी येथील ५६ वर्षीय पुरुष, केज तालुक्यातील डोका येथील ४४ वर्षीय पुरुष आणि साबला येथील ६६ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.

आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८९ हजार ८१३ इतकी झाली आहे तर, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८६ हजार १७ इतकी झाली आहे. आतापर्यंत २ हजार ३८६ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. सध्या १ हजार ४१० जण उपचाराखाली असल्याची माहिती जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.

Web Title: 165 new patients, 165 coronary free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.