नवे १५७ रुग्ण; १०७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:52+5:302021-07-12T04:21:52+5:30
बीड : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवे १५७ रुग्ण निष्पन्न झाले, तर १०७ जणांनी कोरोनावर मात केली. सुदैवाने एकाही मृत्यूची ...

नवे १५७ रुग्ण; १०७ कोरोनामुक्त
बीड : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवे १५७ रुग्ण निष्पन्न झाले, तर १०७ जणांनी कोरोनावर मात केली. सुदैवाने एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. आता जिल्ह्यात एक हजार १२८ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात शनिवारी तीन हजार ९९५ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार १५७ पॉझिटिव्ह, तर तीन हजार ७५८ जण निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ६, आष्टी ३३, बीड ३४, धारुर ५, गेवराई २३, केज १४, माजलगाव २, परळी ३, पाटोदा २०, शिरुर ७ व वडवणी तालुक्यातील १० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात मागील २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. एकूण मृत्यूचा आकडा दोन हजार ५५६ इतका असून, एकूण बाधितांची संख्या ९३ हजार ५८८ इतकी झाली आहे. ८९ हजार ९०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एक हजार १२८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली.