जीवे मारण्याची धमकी देत १५ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी फरार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 17:51 IST2017-08-25T17:47:21+5:302017-08-25T17:51:30+5:30

गेवराई (बीड ), दि. २५ : शहराजवळील बागपिंपळगावं कॅम्प येथील १५ वर्षीय शाळकरी मुलीवर एका २० वर्षीय तरूणाने  जिवे ...

A 15-year-old schoolgirl threatened to kill, sexual harassment, accused absconding | जीवे मारण्याची धमकी देत १५ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी फरार  

जीवे मारण्याची धमकी देत १५ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी फरार  

गेवराई (बीड ), दि. २५ : शहराजवळील बागपिंपळगावं कॅम्प येथील १५ वर्षीय शाळकरी मुलीवर एका २० वर्षीय तरूणाने  जिवे मारण्याची धमकी देत शारिरीक संबंधाची मागणी केली. मुलीने विरोध केल्याने त्याने बळजबरी करत तिला जवळच्या शेतात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास मदन देवकते (२० ) असे आरोपीचे नाव असून तो बागपिंपळगावं कॅम्प येथेच राहतो. आज सकाळी याच गावातील एक १५ वर्षीय शाळकरी मुलगी प्रातःविधी साठी घराबाहेर पाडली होती. परत येत असताना अचानक रस्त्यातील उसाच्या फडातुन विकास बाहेर आला व तिला जवळ ओढत त्याने मोबाईलमध्ये तिच्या सोबत सेल्फी काढला. यानंतर  जिवे मारण्याची धमकी देत त्याने तिला शरिर सुखाची मागणी केली. तिला बळजबरीने उसाच्या शेतात ओढत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. 

घटनेनंतर मुलीने  घरी जाऊन आई जवळ आपबितीचे कथन केले. यावर तिच्या आईने  तिला सोबत घेत गेवराई पोलीस ठाणे गाठले. मुलीच्या फिर्यादीवरून ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी फरार आहे. घटनेची माहिती  समजताच आरोपीला त्वरित अटक करावी या मागणीसाठी एका गटाने  ठाण्या समोर ठिय्या माडंला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत हे करीत आहेत.

Web Title: A 15-year-old schoolgirl threatened to kill, sexual harassment, accused absconding