शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

परळी येथील 'वैद्यनाथ' दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, कुटुंबियांना प्रत्येकी ६ लाख तर जखमींना दीड लाख रूपये मदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 20:39 IST

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात शुक्रवारी ऊसाचा रसाची गरम टाकी फुटून दुर्घटना झाली होती. यात जखमी झालेल्या 12 कर्मचा-यां पैकी 5 कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे.

परळी (बीड) : पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात शुक्रवारी ऊसाचा रसाची गरम टाकी फुटून दुर्घटना झाली होती. यात जखमी झालेल्या 12 कर्मचा-यां पैकी 5 कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. यातील मृतांच्या नातेवाईकांना  ६ लाखाची तर जखमींना दीड लाख रुपयाची मदत देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री व वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक पंकजा मुंडे यांनी दिली. 

मधुकर आदनाथ, सुभाष कराड, गौतम घुमरे, सुनील भंडारे, सुमेध भंडारे हे १०० टक्के भाजले होते. डीप बर्न झाल्याने उपरोक्त पाच जणांचा मृत्यू झाला. एकूण १२ जण जखमी झाले. त्यात ८ जणांची प्रकृती चिंताजनक होती. त्यातील ५ जण दगावले आहेत. यासंदर्भात प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने म्हणाले, दाखल ९ जणांपैकी ८ जण अतिगंभीर होते.  फुल थिकनेस बर्न असल्याने जीविताला धोका निर्माण होतो. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ.  प्रितम मुंडे, कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्री मुंडे यांनी आज लातूर येथे जाऊन जखमींची भेट घेतली. 

यावेळी पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाल्या, झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मयत व जखमी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांच्या आम्ही पाठिशी आहोत. कारखान्यातील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना कारखान्यातर्फे तीन लाख, मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपये आणि माझे वैयक्तिक एक लाख असे एकूण सहा लाख रुपये, कंत्राटदारांच्या मयत मजूरांना मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख व मुंडे कुटूंबातर्फे एक लाख असे एकूण तीन लाख रुपये मदत देण्यात येईल. तसेच जखमी कर्मचाऱ्यांना मुंडे कुटूंबातर्फे एक लाख व मुख्यमंत्री सहायता निधीतून पन्नास हजार रुपये असे दीड लाख रुपये मदत देण्यात येईल. यासोबतच मृताच्या कुटुंबातील एका व्यक्तीला वैद्यनाथ कारखान्यात नोकरी देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

मुंडे भगिनींना पाहताच नातेवाईकांना झाल्या भावना अनावर 

मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रितम मुंडे व कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्रीमुंडे यांनी रूग्णालयात जाऊन जखमी व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली व त्यांना धीर दिला. यावेळी मुंडे भगिनींना पाहताच जखमींच्या नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. 

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेPritam Mundeप्रीतम मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडे