बीड जिल्ह्यात १५ औषधी दुकानांचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:16 IST2018-10-03T00:16:10+5:302018-10-03T00:16:57+5:30
औषध विक्रेत गैरहजर असणे, औषधांची विक्री बिले न देणे यासारख्या विविध कारणांमुळे जिल्ह्यातील १५ मेडिकलचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने सात महिन्यांत ही कारवाई केली. आणखी चार मेडिकलचे परवाने निलंबित केले जाणार असून त्यासंदर्भात कार्यवाही प्रस्तावित असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले.

बीड जिल्ह्यात १५ औषधी दुकानांचे परवाने निलंबित
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : औषध विक्रेत गैरहजर असणे, औषधांची विक्री बिले न देणे यासारख्या विविध कारणांमुळे जिल्ह्यातील १५ मेडिकलचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने सात महिन्यांत ही कारवाई केली. आणखी चार मेडिकलचे परवाने निलंबित केले जाणार असून त्यासंदर्भात कार्यवाही प्रस्तावित असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात परवानाधारक मेडिकलची संख्या १६०० आहे. पैकी १४०० किरकोळ असून २०० घाऊक (होलसेल) आहेत. या सर्व मेडिकलची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाते. परंतु मागील काही वर्षांपासून या कार्यालयाकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे नियमित तपासणी करताना अडचणी येत आहेत. असे असले तरी आहे त्या मनुष्यबळावर एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत १३२ मेडिकल दुकानांना अचानक भेटी देण्यात आलेल्या आहेत. पैकी १९ ठिकाणी फार्मासिस्ट गैरहजर असणे, ग्राहकांना औषधांची बिले न देण्याचा प्रकार समोर आला आहे. याची गंभीर दखल घेत औषध प्रशासनाने १५ मेडिकलचे परवाने तात्काळ निलंबीत केले आहेत. तसेच राहिलेल्या चार मेडिकलधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे.
दरम्यान,औषध प्रशासनात केवळ आर.बी. डोईफोडे हे एकमेव अधिकारी आहेत. त्यांच्याकडेच जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच अन्न प्रशासनात अनिकेत भिसे, ए.एच. मरेवार हे दोघे निरीक्षक आहेत. दोन्ही विभागाचे सहायक आयुक्त आणि १-१ निरीक्षकांची जागा रिक्त आहे. आहे त्या अधिकारी, कर्मचाºयांवर ताण वाढल्याचे दिसून येत आहे.
अपुºया मनुष्यबळामुळे अडचणी
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त, १ औषध निरीक्षक, १ अन्न सुरक्षा अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. तर लिपीकही केवळ चारच आहेत. त्यातच वरीष्ठ लिपीक एस.आर.खोले यांच्या बदलीचीही चर्चा सुरू आहे.
अद्याप कार्यालयात अधिकृत आले नसले तरी त्यांची बदली उस्मानाबादला झाल्याचे समजते. खोले हे एकमेव अनुभवी कर्मचारी कार्यालयात होते. त्यामुळे कामात गती येत होती. आता त्यांचीही बदली झाल्यावर अनंत अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.
नवख्या अधिकाºयांवर कार्यालयाची धुरा
या कार्यालयात सध्या अनिकेत भिसे, ए.एच.मरेवार, आर.बी.डोईफोडे हे तिनही अधिकारी नवखे आहेत. नव्यानेच आणि पहिलीच पोस्टींग असल्याने त्यांना कामाचा जास्त अनुभव नाही. त्यामुळे त्यांना कोणताही निर्णय तडकाफडकी घेताना अडचणी येत आहेत.
या नवख्या अधिकाºयांवरच सध्या कार्यालयाची धुरा असून सध्या तरी ती यशस्वीपणे पार पाडत असल्याचे दिसून येत आहे.
...
अडचण आल्यास संपर्क साधा
१३२ मेडिकलची तपासणी केली आहे. १५ मेडिकलचे परवाने विविध कारणांमुळे निलंबीत केले आहे. यापुढेही तपासणी करून त्रुटी आढळल्यास कारवाई केली जाईल. नागरिकांच्याही काही अडचणी असल्यास तात्काळ तक्रार करावी, यावर कारवाई केली जाईल.
- आर.बी.डोईफोडे
प्रभारी सहायक आयुक्त औषध प्रशासन, बीड