बीड आरोग्य विभागात १५ रुग्णवाहिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:47+5:302021-06-23T04:22:47+5:30

बीड : जिल्हा आरोग्य विभागाला राज्य शासनाकडून १५ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री तथा ...

15 ambulances admitted in Beed health department | बीड आरोग्य विभागात १५ रुग्णवाहिका दाखल

बीड आरोग्य विभागात १५ रुग्णवाहिका दाखल

बीड : जिल्हा आरोग्य विभागाला राज्य शासनाकडून १५ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याहस्ते याचे लोकार्पण करण्यात आले. तसेच म्युकरमायकोसिस वॉर्डाचाही मुंडे यांनी आढावा घेतला.

आरोग्य विभागासाठी एकूण १५ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या. त्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्रांना ७ व जिल्हा शल्यचिकित्सक यांचे अंतर्गत ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांना ८ रुग्णवाहिका पालकमंत्री मुंडे यांच्याहस्तेे देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, माजी आ. सलीम सय्यद, माजी आ. सुनील धांडे, सचिन मुळुक, राजकिशोर मोदी आदींची उपस्थिती होती.

महिला रुग्णांची विचारपूस

जिल्हा रुग्णालयातील म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यात येणाऱ्या वॉर्डाची धनंजय मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी येथे उपचारासाठी दाखल असलेल्या महिला रुग्णांची विचारपूस केली आणि डॉक्टर्स, नर्स यांच्याबरोबर चर्चा करून माहिती घेतली. त्यांनी रुग्णांना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने मिळण्याच्यादृष्टीने सूचना केल्या. सध्या येथे तीन महिला रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.

===Photopath===

220621\22_2_bed_11_22062021_14.jpeg

===Caption===

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्युकरमायकोसिस वॉर्डचा आढावा घेतला. यावेळी डॉ.एकनाथ माले, डॉ.सुरेश साबळे, डॉ.सुखदेव राठोड, डॉ.अशोक हुबेकर आदी.

Web Title: 15 ambulances admitted in Beed health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.