१२४ नवे रुग्ण, १५४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST2021-06-22T04:23:13+5:302021-06-22T04:23:13+5:30
जिल्ह्यात रविवारी २३५० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सोमवारी दुपारी त्याचे अहवाल प्राप्त झाले. यात १२४ जण बाधित ...

१२४ नवे रुग्ण, १५४ कोरोनामुक्त
जिल्ह्यात रविवारी २३५० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सोमवारी दुपारी त्याचे अहवाल प्राप्त झाले. यात १२४ जण बाधित आढळले तर २२२६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ७, आष्टी २४, बीड २०, धारुर ६, गेवराई १०, केज १४, माजलगाव ४, परळी १, पाटोदा १८, शिरुर १३ व वडवणी तालुक्यातील ७ रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा ९० हजार ६४५ इतका झाला असून यापैकी ८६ हजार ९७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, २४ तासांत ५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. यात उमरी रोड केज येथील ६२ वर्षीय पुरुष, मंगरुळ (ता. आष्टी) येथील ५५ वर्षीय पुरुष, दैठणा (ता. केज) येथील ८५ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील ४७ वर्षीय पुरुष व ब्रह्मनाथतांडा (ता. वडवणी) येथील ६० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आता एकूण बळींचा आकडा २ हजार ४५८ इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.