१२१९ कोरोनामुक्त, ११५० नवे रूग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:33 IST2021-05-16T04:33:11+5:302021-05-16T04:33:11+5:30

जिल्ह्यात शुक्रवारी ४४४७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यात ३२९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले ...

1219 coronary free, 1150 new patients | १२१९ कोरोनामुक्त, ११५० नवे रूग्ण

१२१९ कोरोनामुक्त, ११५० नवे रूग्ण

जिल्ह्यात शुक्रवारी ४४४७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यात ३२९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ११५० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ८०, आष्टी १९४, बीड २७९, धारुर ६९, गेवराई ९७, केज १०३, माजलगाव १००, परळी ३८, पाटोदा ६७, शिरुर ९२, वडवणी ३१ जणांचा समावेश आहे. एकूण बाधितांचा आकडा ७३ हजार ५२५ इतका झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६५ हजार ४८६ इतकी झाली आहे. जुन्या १६ तर नवीन २४ तासांत मृत्युमुखी पडलेल्या १८ जणांची नोंद नोंद आरोग्य विभागाकडे झाली. त्यामुळे बळींचा आकडा १३७८ इतका झाला आहे. सध्या ६ हजार ७६६१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जि.प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी दिली.

अँटीजनमध्ये २५ बाधित

आरोग्य विभागातर्फे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची धरपकड करुन अँटीजन चाचणी केली जात आहे. बीडमध्ये शनिवारी १८१ हिंडफिऱ्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २५ जण बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: 1219 coronary free, 1150 new patients