जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १२१ उमेदवारांचे अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:42 IST2021-02-25T04:42:02+5:302021-02-25T04:42:02+5:30
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी छाननीप्रक्रिया झाली. सुनावणी, निकालप्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पार पडली. दरम्यान, ...

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १२१ उमेदवारांचे अर्ज बाद
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २१४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी छाननीप्रक्रिया झाली. सुनावणी, निकालप्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पार पडली. दरम्यान, राखीव ठेवलेल्या अर्जांवरही निर्णय झाला. यात सेवा सोसायटी मतदारसंघातील सर्वच उमेदवारांचे अर्ज ऑडिट वर्ग अ व ब च्या मुद्द्यावरून नामंजूर झाले.
मतदारसंघ - मंजूर अर्ज - नामंजूर
इतर संस्था मतदार संघ- १३ - ३
नागरी बँक , पतसंस्था - १२- १
कृषी व पणन प्रक्रिया -- ७-००
इमाव -- ४- ७
महिला राखीव ३- १५
अनु. जाती जमाती -- ५-- १२
विजाभज-- १४ -- १०
सेवा सोसायटी ००- ६६
---------
वैध उमेदवार
इतर संस्था मतदारसंघ : नवनाथ शिराळे, दत्तात्रय देशमुख, सुग्रीव मुंडे, शशिकांत आजबे, महादेव तोंडे, शहादेव हिंदोळे, अमोल आंधळे, धनराज मुंडे, आशाबाई काळकुटे, फुलचंद मुंडे, बदामराव पंडीत, राधाकिसन शेंबडे, श्रीमंत जायभाये यांचे अर्ज शाबूत राहिले.
----------
नागरी बँक, पतसंस्था मतदारसंघ: गंगाधर आगे, संगीता अशोक लोढा, महारूद्र शेळके, राजकिशोर मोदी, विलास सोनवणे, आदित्य सारडा, चंद्रकांत सानप, संजय आंदळे, रंगनाथ धोंडे, सत्यसेन मिसाळ, दीपक घुमरे यांचे अर्ज वैध ठरले.
-------
कृषी पणनप्रक्रिया मतदारसंघ : रामदास खाडे, भाऊसाहेब नाटकर, आसाराम मराठे, संगीता बडे, बजरंग सोनवणे, जगदीश काळे, केरबा गुंड यांची उमेदवारी वैध ठरली.
-----------
इमाव मतदारसंघ : कल्याण आखाडे, राजेश धोंडे, दिनेश परदेशी, रंगनाथ धोंडे यांचे अर्ज वैध ठरले.
------
महिला राखीव मतदारसंघ: सुशीला पवार, प्रयाग साबळे, कल्पना शेळके यांचे उमेदवार अर्ज वैध ठरले.
------
अनु. जाती, जमाती मतदारसंघातून यशवंत खंडागळे, दिलीप भोसले, वर्षा उजगरे, परमेश्वर उजगरे, रवींद्र दळवी यांचे अर्ज पात्र ठरले.
-------
विजागज/ विमाप्र मतदारसंघ : महेंद्र गर्जे, वसंतराव सानप, सुग्रीव मुंडे, मधुकर ढाकणे, महादेव तोंडे, विजयसिंह बांगर, सूर्यभान मुंडे, नवनाथ प्रभाळे, वैजिनाथ मिसाळ, चंद्रकांत सानप, अमोल आंधळे, संजय आंधळे, सत्यसेन मिसाळ, श्रीमंत जायभाये यांचे अर्ज वैध ठरले.
----
अपिलसाठी ३ तर निर्णयासाठी दहा दिवस
अपात्र ठरलेल्या उमेदवारांना विभागीय सहनिबंधकांकडे अपील करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी दिला आहे. तर विभागीय सहनिबंधकांना दहा दिवसांत निर्णय द्यायचा आहे. या निर्णयानंतर समाधान न झालेल्या अर्जदारांना उच्च न्यायालयात जाता येणार आहे.
--------
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत नियम, अधिनियम, उपविधिंचे अनुपालन करून छाननीप्रक्रिया झाली. अनुपालन नसल्याने मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज बाद झाले. -- विश्वास देशमुख, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक, बीड.
----------
जिल्हा बँक व सहकार कायद्यातील नियम, अधिनियम, उपविधिंची उमेदवारांना माहिती नसल्यानेच बहुतांश उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले. संस्थांच्या कारभारात सहभाग नसला की, असे प्रसंग उद्भवतात. कारण, ७३५ पैकी जवळपास ७२० सोसायट्यांचा ऑडिट दर्जा क व ड आहे. या संस्था सक्षम केल्या असत्या तर ऑडिट दर्जा अ किंवा ब मिळाला असता. परंतु, केवळ निवडणुकीपुरते लढणाऱ्यांचा सोसायटीच्या दर्जाने घात केल्याचे या निवडणुकीत दिसून आले.