शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

12 वर्षीय मुलीच्या डोळ्यातून निघायचे वाळूचे खडे; आरोग्य तपासणीत धक्कादायक सत्य आले समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 15:16 IST

मुलीच्या डोळ्यातून वाळूचे खडे बाहेर येत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात झाला व्हायरल

ठळक मुद्दे बीडमधील आरोग्य यंत्रणेची सुट्टीच्या दिवशीही धावपळ 

- सोमनाथ खताळबीड : बीडमध्ये एका १२ वर्षाच्या मुलीच्या डोळ्यातून  वाळूचे खडे पडत असल्याचा व्हिडीओ मागील चार दिसांपासून संपूर्ण राज्यात व्हायरल झाला आहे. त्यानंतर बीडची आरोग्य यंत्रणा रविवारी सुट्टी दिवशीही कामाला लागली. वैद्यकीय तपासण्या केल्यावर तिला कसलाच आजार दिसला नाही. आई आणि मुलीला दहा मिनिटांसाठी बाजूला बसविताच तिने आपल्या हाताने डोळ्यात खडे टाकले आणि नंतर ते बाहेर काढले. हे वास्तव समोर येताच सर्वांनाच धक्का बसला. 

बीड शहरातील गोविंद नगर भागात एक कुटूंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवित असून त्यांना चार मुली आहेत.दुस-या क्रमांकाची शिवाणीच्या (वय १२ वर्षे, नाव बदलले) डोळ्यातून वाळूचे खडे येत असल्याचे दिसून आले. तिच्या आईने व्हिडीओ तयार केला. तो सोशल मिडीयावर व्हायरल केला. मिडीयाला माहिती देऊन याचा मोठा बोभाटा केला. रविवारी सकाळी ‘लोकमत’ने या मुलीची भेट घेतली. खडे निघत असल्याचे समजताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना माहिती दिली. डॉ.थोरात यांनी सदरील मुलीला जिल्हा रूग्णालयात आणून नेत्र विभागाला तपासणीचे आदेश दिले. सर्व तपासण्या केल्यावर कसलाच आजार दिसला नाही. त्यानंतर एक तास वाट पाहिली. तिच्या डोळ्यातून खडे आले नाहीत.

त्यानंतर शक्कल लढवून तीनच खडे काढून ते मुलीच्या हातात दिले. आईलाही तिच्यासोबत पाठविण्यात आले. एक तास वाट पाहिल्यावर खडे आले नव्हते. मात्र, आई जवळ जाताच अवघ्या पाच मिनीटांत डोळ्यातून खडा बाहेर आला. त्यानंतर पुन्हा सात खडे देण्यात आले. १५ मिनीटांनी त्यातील एक खडा गायब होता. तो पाच मिनीटांनी मुलीच्या डोळ्यातून निघाला. त्यानंतर हा सर्व प्रकार खोटा असल्याचे समोर आले. या खोट्या प्रकाराने मात्र, संपूर्ण नेत्र विभाग रविवारच्या दिवशीही रूग्णालयात दिवसभर ठाण मांडून होता.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह नेत्र तज्ज्ञ डॉ.चंद्रकांत वाघ, डॉ.राधेश्याम जाजू, डॉ.नितीन रेंगे, टेक्निशिअन महाविर मांडवे, विशांत मोराळे, रमेश सौंदरमल, परिचारीका डोरले आदी यंत्रणा दिवसभर या मुलीवर उपचार करीत होते.

सहानुभूती मिळविण्याचा प्रकार?हा सर्व प्रकार केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी केल्याचा संशय आहे. हे वास्तव उघड झाल्यावर सदरील महिलेला विचारणा केल्यावर तिने आश्रु आणत विषयाला बगल दिली. डॉक्टरांनी तिचे समुपदेशनही केले. त्यानंतर सोनल पाटील यांनीही समजुत काढली मग तिचे आश्रु थांबले. तिला आपली चुक लक्षात आल्यावर तिने शांत होऊन काढता पाय घेतला. मात्र, या सर्व प्रकारामुळे यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. डोळ्यातून निघालेले खडे हे वाळूचे असावेत. असा कुठलाही खडा माणसाच्या शरिरात तयार होत नाही, किंवा जास्त दिवस राहू शकत नाही. पोटात खडा असला तरी तो डोळ्यातून निघण्याचा संबंधच येत नाही. ही सर्व बनवाबनवी असल्याचे दिसून आले. बाहेरून खडे टाकल्यामुळे मुलीच्या डोळ्याला जखम होत आहे. तसेच ते लालही झाले आहेत. खड्यांचे इन्फेक्शन होऊ शकते, कॉर्नियाला इन्फेक्शन झाले तर कायमचा आंधळेपणा येऊ शकतो.- डॉ.चंद्रकांत वाघनेत्रतज्ज्ञ, जिल्हा रूग्णालय बीड,

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलHealthआरोग्यBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड