समृध्द ग्राम स्पर्धेत १२ गावे पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:59 IST2021-03-13T04:59:31+5:302021-03-13T04:59:31+5:30
तालुक्यातील विविध गावांनी पानी फाऊंडेशनच्या वाॕॅटर कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. राज्य पातळीपर्यंत यश मिळवले होते. आता पाणी ...

समृध्द ग्राम स्पर्धेत १२ गावे पात्र
तालुक्यातील विविध गावांनी पानी फाऊंडेशनच्या वाॕॅटर कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. राज्य पातळीपर्यंत यश मिळवले होते. आता पाणी फाऊंडेशनने ग्रामसमृद्धी योजना सुरू केली आहे. तालुक्यातील २३ गावे यात सहभागी झाली होती. या गावांपैकी सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात १२ गावे सन्मानास पात्र झाली आहेत. यात जायभायवाडी, हसनाबाद, अंजनडोह, मोरफळी, व्हरकटवाडी, अंबेवडगाव, देवठाणा,
हिंगणी बू, निमला, आमला, सुरनरवाडी, शिंगणवाडीचा समावेश आहे. या गावातील जलमित्र, सरपंच, उपसरपंच, सदस्य, माजी सरपंच, गावकरी, सी आर पी ताई, बचत गटातील महिला, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामसेवक, कृषी सहायक, सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून ही गावे पात्र ठरली. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याहस्ते या गावांचा सन्मान होणार असल्याचे सांगण्यात आले. स्पर्धेचा पुढील टप्प्यासाठी आता ग्रामस्थ एकवटले आहेत. पानी फाऊंडेशनच्यावतीने मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे, तालुका समन्वयक नितीन पाटुळे यांनी ही माहिती दिली.
===Photopath===
120321\anil mhajan_img-20210312-wa0071_14.jpg
===Caption===
धारूर तालुक्यातील १२ गावे ग्रामसमृद्धी स्पर्धेत पात्र ठरली आहेत.