शिरूर तालुक्यात आठवडाभरात कोरोनाचे ११९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:35 IST2021-04-09T04:35:11+5:302021-04-09T04:35:11+5:30
शिरूर कासार तालुक्यात आठ दिवसांपूर्वी शुक्रवारी कोरोनाबाधितांची संख्या दहा होती. पुढे ती १२,१५,२४ वरून मंगळवारी ३१ वर गेली असल्याने ...

शिरूर तालुक्यात आठवडाभरात कोरोनाचे ११९ रुग्ण
शिरूर कासार तालुक्यात आठ दिवसांपूर्वी शुक्रवारी कोरोनाबाधितांची संख्या दहा होती. पुढे ती १२,१५,२४ वरून मंगळवारी ३१ वर गेली असल्याने काहीसे चिंतेचे सावट पसरले होते. हा आकडा असाच वाढता राहतो की काय, अशी भीती व्यक्त होत असतानाच बुधवारी तो आकडा २१ वर, तर गुरुवारी आणखी घट होऊन तो १६ वर आल्याने काहीसा दिलासा मिळाला. तालुक्यात आठवडाभरात एकूण रुग्णसंख्या ११९ झाली. नियमांचे पालन केल्यास व सावधगिरी बाळगल्यास तालुका कोरोनाला हरवू शकतो. मात्र, त्यासाठी नागरिकांनी आणखी काही दिवस तरी मास्क, सुरक्षित अंतर, गर्दी न करणे याबाबींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी व्यक्त केले. तालुक्यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तहसीलदार श्रीराम बेंडे, नगरपंचायत मुख्याधिकारी किशोर सानप व पोलीस उपनिरीक्षक डॉ. रामचंद्र पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.