११४ कोरोनामुक्त, १०४ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:04+5:302021-07-07T04:41:04+5:30

बीड : जिल्ह्यात कोराेनाच्या रूग्णसंख्येत चांगली घट होत असून सोमवारी १०४ नवे रुग्ण आढळून आले तर ११४ जण कोरोनामुक्त ...

114 coronal free, 104 new patients | ११४ कोरोनामुक्त, १०४ नवे रुग्ण

११४ कोरोनामुक्त, १०४ नवे रुग्ण

बीड : जिल्ह्यात कोराेनाच्या रूग्णसंख्येत चांगली घट होत असून सोमवारी १०४ नवे रुग्ण आढळून आले तर ११४ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९२ हजार ६२३ झाली असून ८९ हजार ८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान मागील २४ तासांत २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

सोमवारी जिल्ह्यात २ हजार १६६ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. प्राप्त अहवालानुसार १०४ जण बाधित सापडले तर २ हजार ६२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्या बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात केवळ १, आष्टी तालुक्यात २४, बीड तालुक्यात १९, धारुर तालुक्यात ३, गेवराई तालुक्यात १४, केज तालुक्यात ८, पाटोदा तालुक्यात १२, शिरुर तालुक्यात १६ आणि वडवणी तालुक्यात ६ नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात ११४ जणांनी कोरोनावर मात केली त्यांना रुग्णालयातून सुटी दिली गेली.

जिल्ह्यात मागील २४ तासांत दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यात बीड तालुक्यातील माळेवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष आणि पाटोदा तालुक्यातील निवडुंगा येथील ६० वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९२ हजार ६२३ झाली असून ८९ हजार ८५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत २ हजार ५४२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९९६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Web Title: 114 coronal free, 104 new patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.