बीड : शनिवारी बीड येथे झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील एसबीआयचे ११२ खातेधारक कर्जमुक्त झाले. त्यांच्याकडे २ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी होती.बीडसह जिल्ह्यात शनिवारी लोकअदालतमध्ये विविध विभागांचे तसेच बॅँकांचे आणि इतर प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. जिल्ह्यात स्टेट बॅँक आॅफ इंडियाच्या ४० शाखांमधून ११२ जणांनी कर्ज घेतले होते. यात कृषी, व्यापारी, वैयक्तिक आणि सतर कर्ज प्रकारांचा समावेश होता. या कर्जदारांना वाटप केलेल्या कर्जापैकी जवळपास २ कोटी ४३ लाख रुपये थकबाकी होती. मागील ५- ६ वर्षांपासून ही थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. कर्जभरणा करण्याबाबत बॅँक अधिकाऱ्यांनी संबंधित कर्जधारकांकडे पाठपुरावा केला.बीड येथे होणाºया लोकअदालतच्या पार्श्वभूमीवर एसबीआयच्या निकषांनुसार नियमाप्रमाणे सवलत देण्याबाबत व कर्जभरणा करण्याबाबत बॅँक आणि कर्जधारकांत तडजोड झाली. त्यानुसार कर्जदारांना सवलतीची रक्कम निकषानुसार मंजूर करण्याचे व त्यानुसार उर्वरित थकबाकी भरण्याबाबत समेट झाल्याबाबत न्यायालयात प्रस्ताव ठेवल्यानंतर त्यास मंजूरी देण्यात आली. ११२ कर्जदारांकडे असलेली २ कोटी ४३ लाखांची कर्ज थकबाकी माफ करण्यात आली. ११२ खातेदार कर्जातून मुक्त झाले आहेत.याकामी एसबीआयचे सहायक महाप्रबंधक संजय चामणीकर, उपप्रबंधक दीपककुमार आणि एसबीआयच्या सर्व शाखांच्या व्यावस्थापकांनी कार्यवाही पूर्ण केली.
११२ खातेदार झाले कर्जमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:27 IST
शनिवारी बीड येथे झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील एसबीआयचे ११२ खातेधारक कर्जमुक्त झाले. त्यांच्याकडे २ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी होती.
११२ खातेदार झाले कर्जमुक्त
ठळक मुद्देलोकअदालतचा फायदा : २ कोटी ४३ लाखांची होती कर्जाची थकबाकी