११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:37 IST2021-08-19T04:37:27+5:302021-08-19T04:37:27+5:30

विक्रम भगवान पवार (२४,रा.विद्यानगर, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे. तो मार्च २०२१ मध्ये कामानिमित्त पीडित मुलीच्या गावी महिनाभर ...

11 year old girl tortured, accused arrested | ११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, आरोपी जेरबंद

११ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, आरोपी जेरबंद

विक्रम भगवान पवार (२४,रा.विद्यानगर, बीड) असे त्या आरोपीचे नाव आहे.

तो मार्च २०२१ मध्ये कामानिमित्त पीडित मुलीच्या गावी महिनाभर मुक्कामी होता. या दरम्यान त्याची व पीडितेची ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्याने पीडितेला पैशांचे आमिष दाखवून १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता शेतात नेले. तेथे मकाच्या पिकात त्याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, हा प्रकार गावातील काही लोकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यास चोप देत नेकनूर पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. उपअधीक्षक विजय लगारे तपास करत आहेत. दरम्यान, आरोपी विक्रम पवार यास १८ ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी दिली.

...

आरोपीवर चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न

दरम्यान, या संतापजनक घटनेनंतर राष्ट्रवादी महिला आघाडीच्या ॲड. हेमा पिंपळे यांनी नेकनूर येथे धाव घेतली. पोलीस ठाण्यातून आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी जीपमध्ये बसविताना त्यांनी त्याच्या दिशेने चप्पल भिरकावली. मात्र, पोलिसांनी ॲड. पिंपळे यांना रोखले.

....

Web Title: 11 year old girl tortured, accused arrested