मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ११ पुराव्यांचा पर्याय

By Admin | Updated: October 9, 2014 00:39 IST2014-10-08T23:56:36+5:302014-10-09T00:39:22+5:30

बीड : लोकसभा पोटनिवडणूक, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता ११ पर्यायांचा पुरावा उपलब्ध आहे़ ११ पैकी कुठलाही एक पुरावा देऊन मतदान करता येईल़

The 11-point option to claim voting rights | मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ११ पुराव्यांचा पर्याय

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ११ पुराव्यांचा पर्याय


बीड : लोकसभा पोटनिवडणूक, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याकरिता ११ पर्यायांचा पुरावा उपलब्ध आहे़ ११ पैकी कुठलाही एक पुरावा देऊन मतदान करता येईल़
१५ आॅक्टोबर रोजी लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेच्या सहा जागांसाठी एकाच वेळी मतदान होत आहे़ मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाने सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले आहेत़ जनजागृती रॅली, डिजीटल बोर्ड, लाऊडस्पीकर, पथनाट्ये आदी माध्यमातून मतदानाचे महत्व नागरिकांना पटवून दिले आहे़
मतदान करण्यासाठी ११ पर्याय उपलब्ध केले आहेत़ पारपत्र, वाहन चालक परवाना, राज्य-केंद्र सरकार सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कंपनीकडून निर्गमित केलेले ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक, पोस्ट कार्यालयाकडून निर्गमित केलेले पासबुक, आधार कार्ड, आरजीआय राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, स्वास्थ्य विमा स्मार्टकार्ड, सेवानिवृत्तचे छायाचित्रासह निर्गमित केलेले कागदपत्रे, मतदान ओळखपत्र यापैकी एक पुरावा देता येतो़ (प्रतिनिधी)

Web Title: The 11-point option to claim voting rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.