आष्टी मतदारसंघात विकासकामांना १०५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST2021-03-08T04:31:03+5:302021-03-08T04:31:03+5:30
आष्टी येथील विश्रामगृहात ७ रोजी सकाळी १० वाजता पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी ...

आष्टी मतदारसंघात विकासकामांना १०५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त
आष्टी येथील विश्रामगृहात ७ रोजी सकाळी १० वाजता पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी उपस्थित होते. आजबे म्हणाले की, आष्टी मतदारसंघात विविध विकासकामांना मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाला आहे. विरोधकांनी विकासाबाबत चिंता करण्याची गरज नाही. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर सरकारकडून निधी खेचून आणून विकासमय मतदारसंघ झाल्याशिवाय राहणार नाही. मतदारसंघामध्ये २५१५ ची २०२०-२१ अंतर्गत एकूण ३५३ कामांसाठी ११ कोटी ५१ लाख ७३ हजार रुपयांची, जिल्हा नियोजन १ कोटी ५ लाख, जिल्हा नियोजन सिमेंट नाला बंधारा शेरी बुद्रुक, हारेवाडी, नांदा पारगाव घुमरा, सिमेंट नाला बंधारे प्रत्येकी २५ लाख रुपये, समाज कल्याण जिल्हा परिषद बीड अंतर्गत १ कोटी ३० लाख रुपये, पशुसंवर्धन वैद्यकीय दवाखाना धानोरासाठी ३० लाख रुपये निधी आला आहे.
जिल्हा परिषद कन्या शाळा १ कोटी रुपये, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा लोणी ३५ लाख रुपये, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सौताडा ४० लाख रुपये, आष्टी येथील न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता ७ कोटी १२ लाख ७७ हजार १८७ रुपये, रस्ते विकास अंतर्गत २२ कोटी, केंद्रीय रस्ते विकास अंतर्गत ४ कोटी रुपयांचा निधी आणल्याचे आ. आजबे यांनी सांगितले.