१२ गरजुंना व्यवसायासाठी १० हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:01+5:302021-03-10T04:33:01+5:30
: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती पूर्व बीडच्या वतीने स्वावलंबन आयाम अंतर्गत शहर व तालुक्यातील १२ गरजुंना व्यवसाय करण्यासाठी ...

१२ गरजुंना व्यवसायासाठी १० हजारांची मदत
: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती पूर्व बीडच्या वतीने स्वावलंबन आयाम अंतर्गत शहर व तालुक्यातील १२ गरजुंना व्यवसाय करण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत सोमवारी करण्यात आली.
येथील एका मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात या मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रातांचे मान्यवर संभाग कार्यवाह नायगावकर , तसेच प्रमुख देवगिरी प्रांताच्या पद्माताई कुबेर ,लातूर विभाग कार्यवाह
नरेंद्र पाठक , संभाग कार्यालय प्रमुख
रमेश जोशी, दिन दयाळ बँकेचे शाखाधिकारी जगदिश देशमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती पुर्व बीड चे जिल्हाध्यक्ष डॉ. किशोर रत्नपारखी, उपाध्यक्ष जगदीश साखरे, जिल्हा कार्यवाह उन्मेश मातेकर, कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी , अशोक जोशी, संजय कुलकर्णी , रमेशराव जवळेकर यांच्यासह जिल्हातील पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष गोरख मेंडके तसेच निरंजन वाघमारे, जयेश साडेगावकर, मंगलनाथ देशमाने, अनिल गोंडे,राघवेंद्र शिर्शिकर, आनंद कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, ॲड.शेखर देशपांडे, राजेश देशमुख व तालुक्यात समूहाचे सदस्य उपस्थित होत.
===Photopath===
090321\purusttam karva_img-20210309-wa0010_14.jpg
===Caption===
माजलगाव येथे राष्ट्रीयं स्वयंसेवक संघाच्या वतीने १२ गरजुंना व्यावसायासाठी मदत करण्यात आली. त्यावेळी पदाधिकारी व लाभार्थी.