आणखी १० कोरोनाबळी; ३६१ नवे रुग्ण, तर ७६२ काेरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST2021-06-02T04:25:32+5:302021-06-02T04:25:32+5:30

जिल्ह्यातील ३ हजार ७९१ संशयितांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली. यात ३६१ नवे रुग्ण निष्पन्न झाले तर ३ हजार ...

10 more corona sacrifices; 361 new patients, while 762 carotene-free | आणखी १० कोरोनाबळी; ३६१ नवे रुग्ण, तर ७६२ काेरोनामुक्त

आणखी १० कोरोनाबळी; ३६१ नवे रुग्ण, तर ७६२ काेरोनामुक्त

जिल्ह्यातील ३ हजार ७९१ संशयितांची सोमवारी कोरोना चाचणी करण्यात आली. यात ३६१ नवे रुग्ण निष्पन्न झाले तर ३ हजार ४३० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई ३०, आष्टी ६०, बीड ७०, धारूर १७, गेवराई २४, केज ४४, माजलगाव २९, परळी १२, पाटोदा २९, शिरूर २८ आणि वडवणी तालुक्यातील १८ जणांचा समावेश आहे. तसेच दिवसभरात ७५६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

दरम्यान मागील २४ तासांत जिल्ह्यात १० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यात अस्वला (ता.धारूर) येथील ५५ वर्षीय पुरुष, रुपूर (ता. शिरूर कासार) येथील ६० वर्षीय पुरुष, डोंगरी (ता.पाटोदा) येथील ६५ वर्षीय महिला, माजलगाव शहरातील ७० वर्षीय महिला, मल्लिकपुरा, परळी येथील ५० वर्षीय पुरुष, गिरवली (ता. अंबाजोगाई) येथील ५ वर्षीय मुलगा, बेडुकवाडी (ता.पाटोदा) येथील ७० वर्षीय पुरुष, पूस (ता.अंबाजोगाई) येथील ४५ वर्षीय पुरुष, परळी शहरातील २५ वर्षीय पुरुष व लिंबगाव (ता. बीड) येथील ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.

आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ८६ हजार ९३२ इतकी झाली असून यापैकी ८० हजार ४६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर आतापर्यंत १९९९ जणांचा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ४ हजार ४६६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, डीएचओ आर.बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी पी.के. पिंगळे यांनी दिली.

Web Title: 10 more corona sacrifices; 361 new patients, while 762 carotene-free