शैक्षणिक संस्थेच्या प्रक्षेत्रावर करणार १ लाख अकरा हजार वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST2021-07-01T04:23:32+5:302021-07-01T04:23:32+5:30

अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या बेसुमार वापरामुळे ऊर्जास्रोत लोप पावत चालले आहेत. यामध्ये पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, दगडी कोळसा यांचा समावेश होतो. ...

1 lakh 11 thousand trees will be planted on the farm of the educational institution | शैक्षणिक संस्थेच्या प्रक्षेत्रावर करणार १ लाख अकरा हजार वृक्ष लागवड

शैक्षणिक संस्थेच्या प्रक्षेत्रावर करणार १ लाख अकरा हजार वृक्ष लागवड

अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या बेसुमार वापरामुळे ऊर्जास्रोत लोप पावत चालले आहेत. यामध्ये पेट्रोल-डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, दगडी कोळसा यांचा समावेश होतो. या सर्व बाबींचा विचार करता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल वापरण्यास परवानगी दिली आहे. इथेनॉल उत्पादित करणारी प्रमुख पिके ऊस व बांबू ही आहेत. बांबूपासून विविध प्रकारचे फर्निचर बनवण्यात येते. ज्याचे आयुर्मान रासायनिक अभिक्रिया करून शंभर वर्षापर्यंत वाढविण्यात येऊ शकते. बांबूच्या झाडांचा वापर उच्च प्रतीचा कागद लगदा यासाठी केला जातो. फर्निचर, पेपर, इंधन यासाठी केली जाणारी वृक्षतोड बांबूच्या शेतीला चालना दिल्यामुळे रोखली जाऊ शकते.

बांबू हे पीक हलक्‍या ते भारी जमिनीवर विविध वातावरणामध्ये कमी पाण्यावर घेतले जाऊ शकते. वरील सर्व उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी बांबू लागवडीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचा जन्मदिन १ जुलै कृषी दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या दिनी महाराष्ट्र शासन शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, सर्व कृषी विद्यापीठे तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर व प्रक्षेत्र इत्यादी ठिकाणी विविध शेतीपूरक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये वृक्षलागवड तज्ज्ञांचे मार्गदर्शन याचा समावेश होतो.

१ जुलै २०२१ रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून भीमसेन धोंडे यांच्याहस्ते बांबू लागवडीची सुरुवात श्री छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टीच्या प्रक्षेत्रावर करण्यात येणार आहे. उर्वरित बांबू लागवड ही शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ व आनंद चॅरिटेबल संस्था आष्टी यांच्याअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालये कार्यालयांच्या प्रक्षेत्रावर करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी बांबूची रोपे सिंदखेडराजा, बुलडाणा येथून आणली आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. श्रीराम आरसुळ यांनी दिली आहे.

Web Title: 1 lakh 11 thousand trees will be planted on the farm of the educational institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.