​YOUNGER LOOK : दाढी करण्यापूर्वी लिंबू लावा आणि तरुण दिसा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 15:37 IST2017-02-17T10:07:45+5:302017-02-17T15:37:45+5:30

दाढी करण्यापूर्वी लिंबूचा वापर केल्यास आपली त्वचा मुलायम होऊन कायम तरुण दिसू लागते. विशेष म्हणजे लिंबूचा वापर सेलिब्रिटीही करताना दिसतात.

YOUNGER LOOK: Lemon juice and young eyes before shaving! | ​YOUNGER LOOK : दाढी करण्यापूर्वी लिंबू लावा आणि तरुण दिसा !

​YOUNGER LOOK : दाढी करण्यापूर्वी लिंबू लावा आणि तरुण दिसा !

रंवार दाढी केल्याने पुरुषांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. स्किन खडबडीत होऊन चेहऱ्यावर कठोरपणा दिसून येतो. पण दाढी करण्यापूर्वी लिंबूचा वापर केल्यास आपली त्वचा मुलायम होऊन कायम तरुण दिसू लागते. विशेष म्हणजे लिंबूचा वापर सेलिब्रिटीही करताना दिसतात. 

* शेविंग करण्याच्या पाच मिनिटांपूर्वी आपल्या गालांना आणि ज्या भागात शेविंग करतो चेहऱ्याच्या त्या भागाला लिंबूचा रस लावा. त्यानंतर हातात थोडे पाणी घेऊन हलक्या हातांनी मालिश करा.

* काही मिनिटात तुम्हांला चेहऱ्याची स्किन स्मूथ झालेली वाटेल. त्यापूर्वी चेहºयाला साध्या पाण्याने विना साबणाने धुऊन घ्या. काळजी घ्या चेहऱ्याला टॉवेल किंवा कोणत्याही कापडाने जोरात पुसू नका.

* आता शेविंग करा. शेविंग करताना योग्य दिशेने केली पाहिजे. स्किनला जास्त जोरात रगडून शेविंग करू नका. तुम्हांला लक्षात येईल की लिंबूचा वापर केल्याने तुमची स्किन खूप स्मूथ होईल.

* प्रत्येकवेळी तुम्ही शेविंग करण्यापूर्वी हा उपाय करू शकतात. यामुळे तुमचा चेहरा खडबडीत किंवा रफ होत नाही.

Also Read : ​​शेविंग करण्याअगोदर जाणून घ्या ‘या’ गोष्टी, नाहीतर होणार नुकसान !

Web Title: YOUNGER LOOK: Lemon juice and young eyes before shaving!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.